तरुण भारत

बायोकॉनचा नफा घटला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जैविक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत कंपनी बायोकॉन लिमिटेडचा 30 सप्टेंबर 2020 ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा 23 टक्क्मयांनी घटला आहे. कंपनीचा नफा 195 कोटी रुपयांवर आला आहे. मागच्या वर्षी जुले ते सप्टेंबर कालावधीत 253 कोटी रुपयांचा नफा कंपनीने कमावला होता. एकूण उत्पन्न 1760.3 कोटी रुपयांवर राहिले जे मागच्या वषी 1605.7 कोटी रुपये होते.

Advertisements

कार्यकारी अध्यक्षा किरण मजुमदार शॉ म्हणाल्या की, संशोधन व विकासासाठी यावेळी अतिरीक्त खर्चाचा भार पडला आहे. कर्मचाऱयांप्रती खर्च व इतर खर्चातही वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे विदेशी चलन  दरात वाढीचाही फटका बसून कंपनीचा खर्च वाढला आहे.

बायोकॉन लिमिटेड ही भारतीय औषध क्षेत्रातील बेंगळूर स्थित कंपनी असून किरण मजुमदार शॉ यांनी 1978 मध्ये स्थापली आहे. याअंतर्गत 120 देशांना औषधे पाठवली जातात. यात अमेरिका, युरोप ही विकसित राष्ट्रेही आहेत.  कंपनीचा 2020 मधील अंदाजीत महसूल 4 हजार 885 कोटी रुपयांवर आहे.

Related Stories

सेन्सेक्स-निफ्टी नव्या उच्चांकावर स्थिरावले

Amit Kulkarni

देशामध्ये नवीन आठ खासगी बँका होणार सुरू

Patil_p

चौफेर विक्रीने शेअर बाजार गडगडला

Patil_p

‘सिग्नल’ च्या संस्थापकांचा राजीनामा

Patil_p

भारत फोर्जचा पॅरामाउंट ग्रुपशी करार

Patil_p

प्राप्तिकर विभागाचे नवीन पोर्टल सुरू

Patil_p
error: Content is protected !!