तरुण भारत

घरात घुसून महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी/ म्हापसा

राज्यात सध्या गुह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अशीत एक अंगावर काटा आणणारी घटना काल सायंकाळी करासवाडा म्हापसा येथे घडली. घरातील एक महिला देवाला दिवा लावण्यासाठी जात असताना निखिल काप्से (40) रा. गडहिंगलज कोल्हापूर याने त्या महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली. त्यानंतर एका रुममध्ये बंद करून तिच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी झालेल्या झटापटीत ती महिला गंभीररीत्या जखमी झाली असून दैव बलवत्तर म्हणून कशीबशी तीने त्या इसमाच्या तावडीतून सुटका करून आरडाओरडा करून बाहेर आल्याची घटना म्हापशात घडली. या घटनेमुळे हा परिसर पूर्णतः हादरला असून अशा बिगर गोमंतकीय व्यक्तीपासून सर्वांनी सावधगिरी बाळगावी अशी मागणी म्हापसा पोलिसांनी केली आहे.

याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना गुरुवारी सायं. 7 वा. दरम्यान घडली. सदर महिला आपल्या घरात देवाला दिवा लावण्यासाठी जात असतानाच अचानक एक इसम त्यांच्या घरात शिरला. त्याने थेट आतमध्ये जाऊन घरात एकटीच असलेल्या त्या महिलेच्या गळय़ाला पकडले व आतमध्ये नेले. अचानक आलेल्या त्या इसमामुळे काय करावे काय नाही हे तिला कळेना झाले. त्या नराधम इसमाने तिच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावले व तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. कशीबशी तिने त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र त्याने आतमधून दार बंद केल्याने ती घाबरून गेली. अखेर झालेल्या झटापटीत त्या महिलेने दार उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता तेथे असलेला स्पीकर तिच्या डोक्यावर हाणला मात्र दैव बलवत्तर म्हणून तीने आरडाओरड करीत बाजूला असलेल्या दिराच्या मुलीला बोलावले. दिर व आदी तेथे धावून आले व त्या नराधमाच्या तावडीतून तिची सुटका केली. त्यानंतर आरडाओरड केल्यावर आजूबाजूचे तेथे मजा झाले व त्याला येथेच्छ चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान म्हापसा पोलिसांनी अशा व्यक्तीपासून सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले आहे. घरात राहणाऱया भाडेकरूंची सर्व माहिती पोलिसांना द्यावी तसेच सीफॉर्मवरून करून द्यावे अन्यथा घरमालकांवर कारवाई होऊ शकते असे सूचित केले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सदर संशयित आरोपी तेथे बाजूला असलेल्या एका हॉटेलात कामाला होता त्या हॉटेलच्या मालकाला पोलिसांनी बोलावून घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्नेहा सावळ यांनी घटनेचा पंचनामा केला असून निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Related Stories

पत्रादेवी सीमेवरील तपासणीत दोघांना केले क्वारंटाईन

Omkar B

विलास मेथर खूनप्रकरणी संतोष पिल्लई गजाआड

Patil_p

नवा मोटर वाहन कायदा 1 मे पासून लागू होणारच

Amit Kulkarni

इब्रामपूर, हणखणे, चांदेल हसापूर भागात पूर

Omkar B

बाळ्ळी पंचायतीकडून मान्सूनपूर्व कामांना वेग

Omkar B

आतापर्यंत 44 हजार कामगारांनी सोडला गोवा

Omkar B
error: Content is protected !!