तरुण भारत

दामु नाईक यांनी गोमंतकीयांची माफी मागावी

प्रतिनिधी/ पणजी

गोव्याबाहेर आणि विदेशात काम करणाऱया गोमंतकीय लोकांना ‘बेडूक’ असे संबोधल्याबद्दल दामू नाईक आणि भाजप यांनी जनतेची माफी मागावी. अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते वेन्झी व्हिएगस यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली.

Advertisements

गोव्यातील नागरिक गोव्याबाहेर जाऊन रोजगार व नोकरी धंद्याच्या संधी धुंडाळतात कारण त्यावेळीचे भाजप आणि काँग्रेसची सरकारे तसेच सध्याचे सरकार त्यांना राज्यात रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहे. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांना राज्याबाहेर अथवा विदेशात कामासाठी जाणे भाग असते. पण त्याचवेळी त्यांनी आपल्या मायभूमीशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही आणि गोव्याबरोबर असलेले नाते सांभाळलेले आहे. त्यांना बेडूक  असे संबोधने योग्य नाही. असे व्हिएगस यांनी पुढे पत्रकात म्हटले आहे.

गोव्यातील लोक आणि राज्याबाहेर आणि विदेशात काम करणाऱया गोमंतकीय लोकांबद्दल बोलताना भाजपच्या नेत्यांनी काळजीपूर्वक आपली भाषा व शब्द वापरावेत. विदेशात आणि गोव्याबाहेर नोकरी धंदा करणाऱया गोवेकरांबद्दल असे विधान करणाऱया नाईक आणि भाजपने गोमंतकीय जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे. असेही व्हिएगस यांनी पत्रकात नमुद केले आहे.

Related Stories

भर पावसात होणारी खनिज मालाची वाहतूक पिसुर्ले गावातील नागरिकांनी रोखून धरली

Omkar B

कोरोना संकटकाळात युथ हॉस्टेलने जपली माणुसकी

Patil_p

कोरोनामुळे आणखीन चौघांचा मृत्यू

Omkar B

गोमंतक मराठी साहित्य संमेलन यंदा पेडणेत

Amit Kulkarni

रेल्वेमार्ग दुपदरीकरणास केंद्राची मंजुरी

Amit Kulkarni

अधिवेशनालाही कोरोनाचा दणका

Patil_p
error: Content is protected !!