तरुण भारत

हज यात्रेला जाणाऱ्या बांधवांसाठी इन्कम टॅक्स अट रद्द करा

प्रतिनिधी / वैराग

हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना इन्कम टॅक्स रिटर्न दोन लाखांपेक्षा अधिक बंधनकारक करून एक प्रकारची जाचक अट लावली आहे. ही अट रध्द करावी अशी मागणी केंद्रीय अल्संख्याक मंत्री मुक्तार अब्बास नकवी, व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई – मेलद्वावारे केली असल्याची माहिती मौलाना आझाद विचार मंचाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल यांनी वैराग येथे दिली.

इस्लाम धर्मीयांमध्ये हज करणे हे एक मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक किमान एकवेळ तरी हज यात्रा व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठीच शेतमजूर, मोलमजुरी, शेतकरी, इतरांच्या घरातील धुणी भांडी यांसारखे छोटे मोठे काम करणारे सर्वसामान्य लोक सुद्धा हज यात्रेच्या अपेक्षेने आपल्या तुटपुंज्या मिळकतीतून थोडे फार पैसे वाचवून त्या पैशातून हज यात्रा करण्याचा मानस ठेवतात. त्यामुळे अशी सर्वसामान्य लोक इन्कम टॅक्स रिटर्न (दोन लाखांपेक्षा अधिक) भरणे कसे शक्य आहे ? सर्वसामान्य लोकांचे हजचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सदर अट रद्द करावी. अशी विनंती इस्माईल पटेल, जिल्हाध्यक्ष – मौलाना आझाद विचार मंच यांनी केली आहे.

Advertisements

Related Stories

…म्हणून अजित पवारांनी नाकारली शिवथाळी

triratna

सोलापूर एस.टी स्टॅण्डसमोरील कुंटणखान्यावर छापा

triratna

शहीद जवान सुनील काळे यांच्या परिवारातील एकाला शासकीय नोकरी देणार

triratna

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना दे धक्का

triratna

कुर्डुवाडी शहर व परिसरात नवे २५ कोरोनाबाधित

triratna

सोलापूर : कुर्डुवाडीत आजपर्यंत २४ कोरोना बाधित

Shankar_P
error: Content is protected !!