तरुण भारत

दौडच्या संस्कारातून घडतेय युवापिढी

उत्साहात पार पडली आठव्या दिवशीची दौड : कोंडाजी फर्जंदांच्या वंशाजांची उपस्थिती

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

युवापिढीला देव, देश आणि धर्माचे शिक्षण देत शनिवारी आठव्या दिवशीची दौड काढण्यात आली. धारकऱयांच्या डोक्मयावरील भगवे फेटे, भगवा ध्वज, शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार, उत्साहपूर्ण स्वागत अशा मंगलमय वातावरणात दौड पार पडली. यावषी निर्बंध असले तरी उत्साह मात्र कुठेही कमी नसल्याचे चित्र दिसत होते. स्वराज्याचे सरदार कोंडाजी फर्जंद यांचे तेरावे वंशज संजय फर्जंद यांची शनिवारच्या दौडमध्ये विशेष उपस्थिती होती.

आठव्या दिवशीच्या दौडला ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिर येथून सुरुवात झाली. संजय फर्जंद त्यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. ताशिलदार गल्लीमार्गे, हेमू कलानी चौक, स्टेशन रोड या मार्गांवर ठिकठिकाणी युवक-महिलांनी दौडचे स्वागत केले. महिलांनी औक्षण करून ध्वजाचे पूजन केले.

पाटील गल्ली येथील शनिमंदिर येथे दौडची सांगता झाली. संजय फर्जंद यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली. शिवप्रति÷ान हिंदुस्थान बेळगावतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मागील सलग दोन वर्षे मोहिमेदरम्यान शिवप्रभू दौडमध्ये प्रथम येणाऱया सचिन बाळेकुंद्री व संजय फर्जंद यांचा सत्कार करण्यात आला.

शिवप्रति ष्ठानच्या प्रत्येक उपक्रमात महिलांना पहिली संधी, प्रियांका पावशे (शिवभक्त)

मागील अनेक वर्षांपासून दौडमध्ये सहभागी होत आहे. पहाटे उठून देवदेवातांच्या नावाने जयघोष करणे, डोक्मयावर भगवा फेटा बांधणे, हातामध्ये ध्वज धरणे यातून मिळणारी स्फूर्ती ही वर्षभर पुण्यासारखी असते. शिवप्रति ष्ठा नच्या प्रत्येक उपक्रमात महिलांना पहिली संधी देण्यात येत असल्याचे प्रियांका पावशेने सांगितले.

दौडमुळे चांगले संस्कार होतात , अनंत चौगुले (धारकरी)

व्यसनांच्या आहारी चाललेल्या युवापिढीला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी भिडे गुरुजींनी दुर्गादेवीचा जागर करत दौड सुरू केली. चांगले संस्कार असणारी, धर्माचे ज्ञान असणारी पिढी या माध्यमातून घडत आहे. त्यामुळे दौडला दरवर्षी मिळणारा प्रतिसाद हा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

 शिवरायांच्या विचारांनी लढण्याचे बळ मिळते, विजय कुंटे (धारकरी)

छायाचित्र काढणे हा माझा छंद आहे. त्यामुळे पहाटे उठून दौडमधील क्षण टिपण्याचे काम मागील 14 ते 15 वर्षांपासून करीत आहे. दौडमध्ये जगण्याची प्रेरणा मिळते, शिवरायांच्या विचारांनी लढण्याचे बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

नवीन रेशनकार्डच्या प्रक्रियेला प्रारंभ

Amit Kulkarni

साखर कारखानदारांविरोधात केल्या तक्रारी

Amit Kulkarni

किरण ठाकुर यांचा वाढदिवस साजरा

Amit Kulkarni

वळिवाने माळरानावरील कामांना सुरुवात

Patil_p

संकटकाळी संवेदनशीलता बाळगा!

Amit Kulkarni

आधी धनाचा मेवा नंतरच धन्वंतरीची सेवा!

Rohan_P
error: Content is protected !!