तरुण भारत

किंग्स इलेव्हन पंजाबची हैदराबादवर मात

वृत्तसंस्था/ दुबई

गोलंदाजांच्या भेदक माऱयामुळे किंग्स इलेव्हन पंजाब संघाने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 12 धावांनी सहज मात केली. संदीप शर्मा, जेसॉन होल्डर व रशीद खान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केल्यानंतर सनरायजर्स हैदराबाद संघाने किंग्स इलेव्हन पंजाबला 20 षटकात 7 बाद 126 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखले. पण, हे आव्हानही हैदराबादला पेलवले नाही.

Advertisements

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील लढतीत या सनरायजर्स हैदराबादने पंजाबला नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. केएल राहुल (27) व मनदीप सिंग (17) हे पंजाबचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले.

मनदीपला संदीप शर्माने झेलबाद केले. डीप स्क्वेअर लेगवरील रशीदने त्याचा झेल टिपला. चेंडू स्लॉग करण्याच्या प्रयत्नात मनदीपचा अंदाज चुकला. ख्रिस गेलने 20 चेंडूत 2 चौकार व एका उत्तूंग षटकारासह 20 धावा केल्या. पण, याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यापूर्वीच होल्डरने त्याचा काटा काढत अडसर दूर केला.  लाँगऑफवरील वॉर्नरने गेलचा सोपा झेल टिपण्यात काहीही कसूर केली नाही.

कर्णधार केएल राहुल अव्वल फिरकी गोलंदाज रशीद खानच्या एका अप्रतिम गुगलीवर त्रिफळाचीत झाला. रशीदने येथे राहुलला सलग दोन गुगली टाकले आणि यातील दुसऱया गुगलीवर राहुल बाद झाला. येथे आऊटसाईट ऑफस्टम्पवर चेंडू टॉस करत रशीदने राहुलला ड्राईव्ह मारण्याच्या मोहात पाडले. पण, चेंडूने बॅटची कड घेत यष्टी उदध्वस्त केली आणि केएलची निराशा झाली.

या हंगामात फारशा बहरात नसलेल्या ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा निराशा केली. त्याला 13 चेंडूत 12 धावा करता आल्या. रशीदने दीपक हुडाच्या रुपाने आणखी एक सावज हेरल्यानंतर पंजाबची 5 बाद 88 अशी दैना उडाली. ख्रिस जॉर्डन (7) व मुरुगन अश्विन (4) स्वस्तात बाद झाले. गोलंदाजीत हैदराबादतर्फे संदीप शर्मा (2-29), होल्डर (2-27), रशीद खान (2-14) यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.

धावफलक

किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल त्रि. गो. रशीद खान 27 (27 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मनदीप सिंग झे. रशीद खान, गो. संदीप शर्मा 17 (14 चेंडूत 1 चौकार), ख्रिस गेल झे. वॉर्नर, गो. होल्डर 20 (20 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), निकोलस पूरन नाबाद 32 (28 चेंडूत 2 चौकार), ग्लेन मॅक्सवेल झे. वॉर्नर, गो. संदीप शर्मा 12 (13 चेंडू), दीपक हुडा यष्टीचीत बेअरस्टो, गो. रशीद 0 (2 चेंडू), ख्रिस जॉर्डन झे. अहमद, गो. होल्डर 7 (12 चेंडू), मुरुगन अश्विन धावचीत (शंकर) 4 (4 चेंडू), रवी बिश्नोई नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 7. एकूण 20 षटकात 7 बाद 126.

गोलंदाजी : संदीप शर्मा 4-0-29-2, खलील अहमद 4-0-31-0, जेसॉन होल्डर 4-0-27-2, रशीद खान 4-0-14-2, टी. नटराजन 4-0-23-0.

सनरायजर्स हैदराबाद : 19.5 षटकात सर्वबाद 114 (वॉर्नर 35, विजय शंकर 26. अर्शदीप सिंग 23 धावात 3 बळी, जॉर्डन 17 धावात 3 बळी)

Related Stories

पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव

Patil_p

रामकुमार विजयी, गुणेश्वरन पराभूत

Patil_p

ऑलिम्पियन फुटबॉलपटू एस. एस. हकीम यांचे निधन

Abhijeet Shinde

क्रीडा मंत्रालयाकडून जोसेफ जेम्सना अडीच लाख रूपयांची मदत

Patil_p

मास्टरब्लास्टर सचिनच्या नव्या हेअर लूकची चर्चा

Omkar B

जॉनी बेअरस्टोचे शानदार शतक

Patil_p
error: Content is protected !!