तरुण भारत

चक्रवर्तीच्या चक्रव्युहात दिल्ली कॅपिटल्स नेस्तनाबूत!

आयपीएल टी-20 साखळी सामना : कोलकाता नाईट रायडर्सने लुटले विजयाचे सोने

वृत्तसंस्था/ अबु धाबी

Advertisements

सलामीला बढती मिळालेल्या नितीश राणाने वैयक्तिक दुःख बाजूला सारत 81 धावांची आक्रमक खेळी साकारल्यानंतर व चक्रवर्तीच्या फिरकी चक्रव्युहात अडकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची केकेआरविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात शनिवारी चांगलीच दाणादाण उडाली. प्रारंभी, राणा व सुनील नरेन (64) यांनी 115 धावांची भागीदारी साकारली व या बळावर केकेआरने 6 बाद 194 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात चक्रवर्तीने 20 धावांमध्येच निम्मा संघ गारद केल्यानंतर दिल्लीला 20 षटकात 9 बाद 135 धावांवर समाधान मानावे लागले.

लेगस्पिनर वरुण चक्रवर्तीने 5 गडी बाद करताना या आयपीएल हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी पृथक्करण नोंदवले. शिवाय, पॅट कमिन्सने 19 धावात 3 बळी घेत त्याला पूरक साथ दिली. या उभयतांच्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीचा दाणादाण उडाली. कमिन्सने पहिल्या दोन षटकातच अजिंक्य रहाणे (0) व बहरातील शिखर धवन (6) या दोघांनाही तंबूचा रस्ता दाखवला. चक्रवर्तीने गोलंदाजीला आल्यानंतर तर सातत्याने धक्के देण्याचा सपाटाच लावला. केकेआरसाठी हा 6 वा विजय असून आणखी 3 सामने बाकी असताना त्यांच्या प्ले-ऑफच्या अपेक्षा कायम आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा पराभव ठरला. पण, यानंतरही त्यांचे गुणतालिकेत दुसरे स्थान अबाधित राहिले. दिल्लीतर्फे कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 47 धावांचे योगदान दिले तर ऋषभ पंतने (27) आश्वासक सुरुवात केली होती. कमिन्सने या दोघांनाही तंबूचा रस्ता दाखवला होता.

नितीश राणाची फटकेबाजी

तत्पूर्वी, केकेआरने 194 धावांचा डोंगर उभारला, त्यात नितीश राणाची 53 चेंडूतील 81 धावांची झंझावाती खेळी लक्षवेधी ठरली. त्याच्या खेळीत 13 सणसणीत चौकारांचा समावेश राहिला. या हंगामात प्रथमच उत्तम बहरात आलेल्या सुनील नरेनने देखील 4 षटकार व 6 चौकारांची आतषबाजी करत दिल्लीच्या जखमेवर आणखी मीठ चोळले. वास्तविक, केकेआरचा संघ आरसीबीविरुद्ध मागील लढतीत नामुष्कीजनक रितीने पराभूत झाला होता. पण, येथे ताज्या दमाने मैदानात उतरुन त्यांनी सहज विजयावर शिक्कामोर्तब केले.

धावफलक

केकेआर : शुभमन गिल झे. पटेल, गो. नोर्त्जे 9 (8 चेंडूत 2 चौकार), नितीश राणा झे. देशपांडे, गो. स्टोईनिस 81 (53 चेंडूत 13 चौकार, 1 षटकार), राहुल त्रिपाठी त्रि. गो. नोर्त्जे 13 (12 चेंडूत 1 चौकार), दिनेश कार्तिक झे. पंत, गो. रबाडा 3 (6 चेंडू), सुनील नरेन झे. रहाणे, गो. रबाडा 64 (32 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार), इयॉन मॉर्गन झे. रबाडा, गो. स्टोईनिस 17 (9 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), पॅट कमिन्स नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 7. एकूण 20 षटकात 6 बाद 194.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-11 (शुभमन, 1.5), 2-35 (राहुल त्रिपाठी, 5.4), 3-42 (दिनेश कार्तिक, 7.2), 4-157 (सुनील नरेन, 16.4), 5-194 (नितीश, 19.5), 6-194 (मॉर्गन, 19.6).

गोलंदाजी : तुषार देशपांडे 4-0-40-0, नोर्त्जे 4-0-27-2, रबाडा 4-0-33-2, अक्षर पटेल 1-0-7-0, स्टोईनिस 4-0-41-2, रविचंद्रन अश्विन 3-0-45-0.

दिल्ली कॅपिटल्स : रहाणे पायचीत गो. कमिन्स 0 (1 चेंडू), धवन झे. कमिन्स, गो. 6 (6 चेंडूत 1 चौकार), अय्यर झे. नागरकोटी, गो. वरुण 47 (38 चेंडूत 5 चौकार), पंत झे. शुभमन, गो. वरुण 27 (33 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), हेतमेयर झे. त्रिपाठी, गो. वरुण 10 (5 चेंडूत 1 षटकार), स्टोईनिस झे. त्रिपाठी, गो. वरुण 6 (6 चेंडू), अक्षर पटेल त्रि. गो. वरुण 9 (7 चेंडूत 1 षटकार), रबाडा झे. त्रिपाठी, गो. कमिन्स 9 (10 चेंडूत 1 चौकार), अश्विन नाबाद 14 (13 चेंडूत 2 चौकार), तुषार देशपांडे झे. मॉर्गन, गो. फर्ग्युसन 1 (3 चेंडू), नोर्त्जे नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 9 बाद 135.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-0 (रहाणे, 0.1), 2-13 (धवन, 2.3), 3-76 (ऋषभ, 11.2), 4-95 (हेतमेयर, 13.2), 5-95 (अय्यर, 13.3), 6-110 (स्टोईनिस, 15.1), 7-112 (अक्षर, 15.5), 8-132 (रबाडा, 18.5), 9-135 (तुषार देशपांडे, 19.5).

गोलंदाजी : कमिन्स 4-017-3, कृष्णा 2-0-19-0, नागरकोटी 2-0-11-0, फर्ग्युसन 4-0-30-1, नरेन 4-0-37-0, चक्रवर्ती अरुण 4-0-20-5.

Related Stories

मानांकन यादीत बेलारूसची साबालेन्का सातव्या स्थानी

Patil_p

अमेरिकन टेनिस स्पर्धेतून नेव्हारोची माघार

Patil_p

आऊटडोअर ट्रेनिंगची परवानगी द्या : हिमा दास

Patil_p

मुंबई सिटीची लढत आज नॉर्थईस्ट युनायटेडशी

Patil_p

तामिळनाडू रणजी संघात बाबा इंद्रजितचा समावेश

Patil_p

दुसऱया ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत रिझवी, रजपूतचे यश

Patil_p
error: Content is protected !!