तरुण भारत

लॉटरीच्या आमिषाने महिलेला सतरा लाखांचा गंडा

प्रतिनिधी/सातारा

मोबाईल नंबरला 25 लाखाची लॉटरीमध्ये एक बीएमडब्ल्यू कार लागल्याचे आमिष दाखवून महिलेची 17 लाख 37 हजाराची फसवणूक अज्ञात भामटय़ांनी केली. याप्रकरणी राजेंद्र नारायण सांभारे (रा. समता पार्क, शाहूपुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

फिर्यादी सांभारे यांच्या पत्नीच्या मोबाईलवर 18 सप्टेंबर रोजी अज्ञात मोबाईलधारकाने कॉल करुन तुमच्या मोबाईल नंबरला 25 लाखाची लॉटरी व एक बीएमडब्ल्यू कार लागल्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास बसावा यासाठी त्यांना एकाने फोन करून स्टेट बॅंकेतून व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून त्यांना लॉटरीबाबत माहिती दिली. यानंतर बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळ्या बॅंक खात्यावर 17 लाख 37 हजार रुपये भरण्यास भाग पाडले.

19 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी संशयितांच्या आमिषाला भुलून पैसे भरले. मात्र, यानंतरही त्यांना कोणत्याच प्रकारची लॉटरीची रक्कम मिळाली नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे करत आहेत.

Related Stories

पोहायला गेलेल्या युवकाचा बंधाऱयात बुडून मृत्यू

Patil_p

माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा उडतोय फज्जा

Patil_p

वाईत दारूच्या नशेत एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

सातारा : जावलीत कोरोनाचे दोन दिवसात ४४ बाधित

Abhijeet Shinde

मुंबईत भरधाव कारने 8 जणांना चिरडले; 5 जणांचा मृत्यू

Rohan_P

साताऱयात ‘हिवसाळा..!’

Patil_p
error: Content is protected !!