तरुण भारत

वेंगुर्ल्यात लोकमान्यतर्फे ‘नवदुर्गे’चा सन्मान

वार्ताहर / वेंगुर्ले:

कोरोना कालावधीत आपल्या कुटुंबापेक्षा रुग्णसेवेसाठी वेळ देत आरोग्य विभागात तालुक्याचे काम करणाऱया व गेली दहा वर्षे तालुका वैद्यकीय अधिकारी व 20 वर्षे ग्रामीण रुग्णालयातून एमबीबीएस डॉक्टर म्हणून शासकीय सेवा देणाऱया डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांचा लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी, शाखा वेंगुर्लेतर्फे शाखा व्यवस्थापक पुरुषोत्तम उर्फ दिलीप राऊळ यांच्या हस्ते नवदुर्गा उत्सवाचे औचित्य साधून नुकताच शाखा कार्यालयात सत्कार करण्यात आला.

डॉ. माईणकर-सामंत या वेंगुर्ले तालुका वैद्यकिय अधिकारी असल्याने कोरोना काळात सुरुवातीपासून तालुक्यात रुग्ण मिळाल्यास त्या-त्या भागात जाऊन सेवा देत आहेत. या बरोबरच जिल्हय़ाच्या आरोग्य यंत्रणेने दिलेले काम चोखपणे पार पाडत आहेत. त्यांची सर्व प्रकारच्या रुग्णांना तसेच कोरोना रुग्णांना सेवा देण्याची कार्यपद्धती वाखाणण्याजोगी आहे. गंभीर वाटणारा आजार त्यांनी केलेल्या मार्गदशानामुळे शारीरिक व मानसिक आजारावर मात करून वेळेपूर्वी बरा होत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडूक कौतुक होत आहे. या नारीशक्तीच्या सत्कार कार्यक्रमप्रसंगी उपस्थित लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी कर्मचारी प्रिया करंगुटकर, निकिता राणे, स्नेहल गावकर, प्रकाश मालवणकर, व्यावसायिक अशोक शिरसाट, पिग्मी एजंट गजानन अंधारी, ज्येष्ठ नागरिक अब्दुल रहेमान शेख आदींसह सोसायटीचे ग्राहक उपस्थित होते. estamp

Related Stories

भाजप आक्रमक, वाटप थांबवण्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प

Patil_p

लांजात जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य अधिकार्‍यासह 40 नवे कोरोना पॉझिटिव्ह

triratna

अभियंता नसताना इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट कसे करणार

Patil_p

रत्नागिरी : लांजाचा आठवडा बाजार गजबजला, ग्राहकांची मात्र पाठ

triratna

जनावरांपासून मानवास होणाऱया रोगाची भीती

NIKHIL_N
error: Content is protected !!