तरुण भारत

सांगली जिल्ह्यात दोन दिवसांत 377 नवीन रूग्ण वाढले

ग्रामीण भागात 325 रूग्ण वाढलेः महापालिका क्षेत्रात 52 रूग्ण वाढलेः उपचार सुरू असताना नऊ जणांचा मृत्यू

प्रतिनिधी / सांगली

जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी नवीन 377 रूग्ण वाढले आहेत. तर 469 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 52 नवीन रूग्ण वाढले तर ग्रामीण भागात 325 रूग्ण वाढले आहेत. आजअखेर 44 हजार 416 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर 40 हजार 768 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
ग्रामीण भागात 325 रूग्ण वाढले आहेत

महापालिका क्षेत्रात रूग्ण कमी झाले आहेत. पण त्याप्रमाणात ग्रामीण भागात रूग्णसंख्या अद्यापही आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढतच आहे. गेल्या दोन दिवसांत 325 रूग्ण वाढले त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 36, जत तालुक्यात 36, कडेगाव तालुक्यात 31 आणि कवठेमहांकाळ तालुक्यात 21 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 47, मिरज तालुक्यात 17 , पलूस तालुक्यात आठ, शिराळा तालुक्यात 31 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 59 तर वाळवा तालुक्यात 39 रूग्ण वाढले आहेत.

जिल्ह्यात नऊ जणांचा बळी

जिल्ह्यात उपचार सुरू असताना नऊ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सांगली शहरात दोन, कवठेमहांकाळ तालुक्यात एक, मिरज तालुक्यात एक, शिराळा तालुक्यात एक, तासगाव तालुक्यात एक, वाळवा तालुक्यात दोन तर जत तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात एक हजार 622 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्ण 377
उपचारात 2026
बरे झालेले 40768
एकूण 44416
मृत्यू 1622

Advertisements

Related Stories

शिराळा येथील सोमवार पेठेत वाहतूक कोंडी

Abhijeet Shinde

सांगलीत सराफ कट्टा बंदला चांगला प्रतिसाद

Abhijeet Shinde

कोरोनाने मरणारी जगायच्या लायकीची नाहीत- संभाजी भिडे

Abhijeet Shinde

सांगली : प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करा निवडणूक; आयोगाच्या प्रशासनाला सूचना

Sumit Tambekar

सांगली : २५ हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी व संगणक ऑपरेटरला अटक

Abhijeet Shinde

विट्याला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!