तरुण भारत

आता घरबसल्या मिळतोय ‘सातबारा’

कायदेशीर कामकाजासाठी अधिकृत : तलाठी सजामधील गर्दी होतेय कमी

तेजस देसाई / दोडामार्ग:

Advertisements

आपल्या जमीन जुमल्याशी निगडीत असलेला सातबारा उतारा आता घरबसल्या केवळ 15 रुपयांत मिळू शकणार आहे. महाराष्ट्र शासनाची या संदर्भात एक वेबसाईट आहे.  या वेबसाईटच्या आधारे सातबारा, 8 ’अ’ तसेच प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वरुपात मिळविता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कागदपत्रे आता सर्व शासकीय, कायदेशीर कामकाजासाठी अधिकृत स्वरुपात वापरता येणार असून दोडामार्ग तालुक्यातील सर्व तलाठी सजामध्ये या कागदपत्रांसाठी होणारी गर्दी आता कमी होणार आहे.

 आपल्या दैनंदिन कामकाजात स्वतःच्या जमिनी क्षेत्राशी निगडित सातबारा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक गावातील तलाठी सजामध्ये सातबारासाठी दररोज अनेकांची ये-जा सुरू असते. प्रसंगी तलाठी जर अन्य कामानिमित्त गावाबाहेर गेले असतील, तर त्यांची भेट न झाल्याने अनेकांना निराशा होऊन माघारी यावे लागत असे. शासनाने सर्व जमीन मालकांना घरबसल्या सातबारा देण्याची योजना आखली होती. 20 सप्टेंबर 2019 पासून एका वेबसाईटद्वारे बऱयाचजणांना आपले सातबारा मिळत आहेत. या वेबसाईटला आजपर्यंत 73 लाख लोकांनी भेट दिली, तर 25 लाखाहून अधिक लोकांनी सातबारा मिळविले आहेत. परंतु बऱयाचजणांना या वेबसाईटची माहिती नसल्यामुळे अनेकजण या सेवेपासून वंचित राहिले.

सहीची आवश्यकता नाही

या सातबारा किंवा 8 अ चा उपयोग करताना कोणत्याही सहीशिक्याची आवश्यकता नाही, असा स्पष्ट उल्लेख केलेले असल्याने सदर सातबारा सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार आहे. दोडामार्ग तालुक्यात 13 तलाठी सजा असून जवळपास 99 सजा संगणकीकृत काम पूर्ण झाल्याने जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन परिविक्षाधीन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे. सदर वेबसाईट 2019 पासून असून त्याचा लाभ घेऊन गर्दी टाळता येईल, असेही पाटील म्हणाले.

असा मिळेल सातबारा

Digital sat bara. Mahabhumi.gov.in ही वेबसाईट ओपन करणे, रेग्युलर लॉग इन व ओटीपी लॉग इन अशा दोन पर्यायातून निवडणे, ऑनलाईन 15 रुपये भरण्यासाठी चार्ट भरणे व आपला सात बारा, 8 अ प्रॉपर्टी कार्ड मिळविणे एवढी सोपी ही पद्धत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. स्वतःचा मोबाईल किंवा कॉम्प्युटर सेंटर अथवा सेतू विभागातही ही सुविधा आहे. ��स्कर धुरी, पूर्वा वाघ, सहना प्रभूदेसाई, भाग्यश्री कुंभार, मैत्रेयी चव्हाण, पूनम कांबळी, पंकज दळवी, ऋतुपर्णा ठाकुर, कणकवली सायकल क्लबचे सदस्य नितांत चव्हाण व सहकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र रावराणे यांनी केले.

Related Stories

अनिल चाफेलकर यांचे अल्पशा आजाराने निधन

NIKHIL_N

प्रवीण भोंसले यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

Ganeshprasad Gogate

विकसित सिंधुदुर्गचे दर्शन घडविणारा लघुपट

NIKHIL_N

पोलिसांनी पोलिसांसाठी सुरू केल ‘कोव्हिड सेंटर’

Abhijeet Shinde

जिल्हा रूग्णालयातील कोरानाग्रस्तांसाठी रोबोटची मदत

Patil_p

परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!