तरुण भारत

हदनाळ, येडूर येथे सीमोल्लंघन उत्साहात

वार्ताहर/ कोगनोळी

हदनाळ येथे दसरा व सीमोल्लंघन सोहळा उत्साहात झाला. गेल्या नऊ दिवसापासून सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.

येथील ग्रामदैवत श्री चव्हाटा देवालयाची मूर्ती मंदिरामध्ये प्रति÷ापित करण्यात आली होती. वर्षातून दोनवेळा ही मूर्ती मंदिरात आणली जाते. विजयादशमीनिमित्त संपूर्ण गावाच्या बाहेरुन सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ असणाऱया मोकळय़ा जागेत सीमोल्लंघन करण्यात आले. तत्पूर्वी या ठिकाणी मुख्य गावकऱयांच्या उपस्थितीत पालख्यांचे व आपटय़ाच्या पानांचे विधीवत पूजन करण्यात आले.

येडूर परिसरात सीमोल्लंघन उत्साहात

येडूर : येडूर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करत श्री वीरभदेश्वराच्या पालखी मिरवणुकीने सीमोल्लंघन साजरे करण्यात आले.

नवरात्रोत्सवानिमित्त 9 दिवस येथील वीरभदेश्वर मंदिरात साधेपणाने शिवसप्ताह साजरा करण्यात आला. भद्रकाली मंदिरामध्ये 9 दिवस विविध रुपामध्ये पूजा बांधण्यात आली. विजयादशमीदिनी सकाळी 6 वाजता श्री वीरभद्रेश्वर देवाची व भद्रकाली देवीची विशेष पूजा बांधण्यात आली होती. सायंकाळी 4 वाजता वीरभद्रेश्वराच्या उत्सवमूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरुन पालखी काढण्यात आली. मंदिराचे धर्माधिकारी श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते पालखीचे पूजन करून सीमोल्लंघनास चालना देण्यात आली.

Related Stories

अखेर समांतर फंड वाटप करण्यास मंजुरी

Patil_p

हिरेबागेवाडीतील तरुणाला कोरोनाची लागण

Patil_p

म्हैसूर : दसरा महोत्सव आयोजनावर प्रश्नचिन्ह

triratna

सीपीएडवरील विशेष कक्ष कुमार गंधर्व सभागृहात

Patil_p

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर : मणिपाल हॉस्पिटल

Shankar_P

खानापूरात कोरोनाबाधित गर्भवती माहिलेची यशस्वी प्रसूती

Rohan_P
error: Content is protected !!