तरुण भारत

कडोली येथे कलमेश्वर देवालयाचा दसरोत्सव उत्साहात

वार्ताहर/ कडोली

कडोली येथील जागृत देवस्थान कलमेश्वर देवालयाच्या दसरोत्सव उत्साहात पार पडला. परंपरेनुसार घटस्थापनेपासून श्री कलमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन आणि पालखी सोहळय़ाने पार पडला. तसेच दररोज विविध रुपात श्री कलमेश्वरची पूजा करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी अष्टमीपासून दसरोत्सवाला सुरुवात झाली. अष्टमी दिवशी गावकऱयांच्यावतीने सर्व देवालयांना श्रीफळ वाढविण्यात आले. तर खंडेनवमी दिवशी नवरत्नाला बसलेल्या भक्तांचा उपवास सोडण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर यात्रा व मंदिराचा आकर्षक भाग असलेल्या केळी झाडांची बन्नी बांधण्याचा कार्यक्रम रात्रभर पार पडला.

Advertisements

रविवारी सकाळी विधिवत पूजा झाल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली.सर्वांनी निर्विघ्नपणे सर्व नियमांचे पालन करीत देवाचे दर्शन घेतले. वाद्याविना बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी देवस्थान पंच, हक्कदारांनी तरंगे आणल्यानंतर बन्नी मोडण्याचा कार्यक्रम झाला. उत्सवाच्या सांगता समारंभात देवालयाच्या पालख्या सोने लुटण्यासाठी सीमेवर पळविण्यात आल्या. यात्रा उत्सवात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देवस्थान पंच कमिटीने सॅनिटायझरची व्यवस्था केली शिवाय गर्दी टाळयासाठी सर्व तयारी केली होती.

Related Stories

बास्केटबॉल रिंगला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Amit Kulkarni

सोमवारी दिलासा, मात्र 984 अहवालांची अद्याप प्रतीक्षा

Patil_p

ऍन्टीबॉडीज तपासण्यासाठी बेळगावात होणार सर्वेक्षण

Patil_p

राष्ट्रध्वजाचा अवमान कधीही खपवून घेणार नाही

Patil_p

मटका बुकींच्या घरांत पोलिसांची शोध मोहीम

Rohan_P

खुनी हल्लाप्रकरणी आणखी एका तरुणाला अटक

Patil_p
error: Content is protected !!