तरुण भारत

कुप्पटगिरीत शिवरायांच्या जयघोषात सांगता

खानापूर / प्रतिनिधी

खानापुरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे नवरात्रीकाळात दुर्गादौड काढण्यात आली. या दौडीची रविवारी कुप्पटगिरी गावात शिवरायांच्या जयघोषात सांगता झाली. सुरुवातीला शिवस्मारक आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिषेक पूजा करून मानवंदना देण्यात आली.

त्यानंतर स्टेशनरोड मार्गे दुर्गा दौडीला प्रारंभ झाला. चिरमुरकर गल्लीत बाजारपेठ मार्गे दुर्गा दौडीचे घाडी गल्लीतील धर्मवीर संभाजी महाराज पुतळय़ाजवळ आगमन झाले. त्या ठिकाणीही संभाजी महाराजांच्या पुतळय़ाची अभिषेक पूजा करून दौडीतील धारकऱयांनी महाराजांच्या पुतळय़ाला मानवंदना दिली. यानंतर गदगा, लक्ष्मी मंदिरमार्गे दुर्गादौड मारुतीनगरात पोहोचली. त्या ठिकाणी स्वयंभू मारुती मंदिराजवळ दौडीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मंदिरासमोर आरती झाल्यावर दौड जुन्या कुप्पटगिरी रस्त्यामार्गे कुप्पटगिरी गावाकडे मार्गस्थ झाली. कुप्पटगिरी गावात दुर्गा दौडीचे आगमन होताच त्या ठिकाणी स्वागत सुहासिनीनी दौडीतील भगव्या ध्वजाची पूजा केली. शेवटी दौड गावातील विठ्ठल मंदिराकडे पोहचताच त्या ठिकाणी महाआरती व प्रेरणा मंत्र होऊन दौडीची सांगता झाली. या दौडीला शनिवार दि. 17 रोजी प्रारंभ झाला होता. दौडीच्या नऊ दिवसाच्या काळात एक दिवस करंबळ तर एक दिवस असोगा या ठिकाणी देखील दौड पोहचली होती. तर दररोज शहरातील विविध मंदिराकडे दौडीची सांगता करण्यात आली.

Related Stories

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Patil_p

संत रोहिदास कॉलनी येथे घरफोडी

Patil_p

सीमाभागाचा आधारस्तंभ हरपला

omkar B

पहावे तेथे शुकशुकाटच !

Patil_p

उत्पादन घटल्याने नारळ दर गगनाला

Patil_p

देवदर्शनांवर सध्या प्रतिबंध

tarunbharat
error: Content is protected !!