तरुण भारत

पोलीस कर्मचाऱयांतर्फे पोलीस हुतात्मा दिन साजरा

प्रतिनिधी/ खानापूर

येथील पोलीस आवारात पोलीस हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलीसांकडून ‘रन फॉर युनिटी’ या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 7 वा पोलीस आवारातून सदर प्रभात फेरीला सुरुवात झाली असून, बाजारपेठ, पारिश्वाड क्रॉस, जांबोटी क्रॉस आदी मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन आवारात फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी बॉर्न टू विन करिअर संघटनेच्यावतीने येथील पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील तसेच पुंडलिक लोकुरे, जगदीश कादोळी, विठ्ठल देवमाने व अन्य पोलीस कर्मचाऱयांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील म्हणाले, देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी कधी नक्षल्यांविरोधात तर कधी समाजविघातक कृत्य करणाऱयांविरोधात कारवाई करताना पोलीस कधीही आपल्या कर्तव्यात मागे न हटता वीरमरण पत्करतात. अशा हुतात्म्यांचे सदैव स्मरण ठेवले पाहिजे. याचबरोबर भावी सैनिक होऊ इच्छिणाऱयांनाही माझा एकच सल्ला आहे. परिस्थिती कोणतीही असो आपल्या कर्तव्याचे पालन करणे हीच आपली जबाबदारी आहे. आणि प्रत्येकाने ती जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याचबरोबर संघटनेचे संस्थापक कपिल गुरव यांनी देखील पोलीसांनी कोवीड-19 मध्ये दिलेल्या निस्वार्थ सेवेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गाकडून हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमाला ‘बॉर्न टू विन करिअर संघटना, कमांडो संघटना व फिटनेस क्लब संघटनेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Stories

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ 5 रोजी

Patil_p

बेळगाव शहरासह जिल्हय़ात 31 जणांना कोरोनाची बाधा

Patil_p

सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी आरटीओंकडून सूचना

Patil_p

मुख्यमंत्र्यांबरोबर जिल्हय़ातील मंत्र्यांची आणि अधिकाऱयांची चर्चा

Patil_p

स्वयंस्फूर्तीने कडकडीत लॉकडाऊन

Patil_p

संगमेश्वरनगर परिसरातील विकासकामांना ब्रेक

Patil_p
error: Content is protected !!