तरुण भारत

तालुक्यात दसरोत्सव पारंपरिक व भक्तीमय वातावरणात साजरा

दुर्गामाता दौडची उत्साहात सांगता, सीमोल्लंघन धामिक पद्धतीने, कोरोनामुळे सर्व कार्यक्रम साधेपणाने

वार्ताहर/ किणये

तालुक्मयात रविवारी दसरोत्सव मोठय़ा उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यंदा कोरोनामुळे नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात आले. रविवारी सायंकाळी तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये पारपंरिक पद्धतीने सीमोल्लंघन करण्यात आले. तसेच गेल्या नऊ दिवसापासून सुरू असलेली दुर्गामाता दौडची चैतन्यमय वातावरणात सांगता झाली.

तालुक्मयात नवरात्र व दसरोत्सव विविध पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे. दसरोत्सवात भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. कोरोना महामारीमुळे देवस्थान पंच कमिटीच्यावतीने दसऱयाच्या कार्यक्रमाला भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. यामुळे काही मोजक्मयाच भाविकांच्या उपस्थितीत दसरोत्सवातील पारंपरिक विधी करण्यात आली.

रविवारी सकाळपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी दिसून आली. नवरात्रोत्सवातील शेवटचा दिवस असल्याने भाविकांनी मनोभावे आपापल्या देवदेवतांचे दर्शन घेतले. दुपारनंतर बहुतांश गावांमध्ये पालखी मिरवणुका झाल्या. या मिरवणुकीमध्ये ढोल ताशासह पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. सायंकाळी गावागावांच्या सीमेवर सीमोल्लंघन झाले. यावेळी आपटय़ाची पाने एकमेकांना देऊन ‘सोन घ्या सोन्यासारखे रहा’ अशा शुभेच्छा देताना नागरिक दिसत होते.

तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये असलेल्या ग्रामदेवता, कुलदेवता, मंदिरामध्ये नऊ दिवस भावभक्तीचा गजर झाला. गेल्या आठ महिन्यापासून सारेजण कोरोनाच्या संकटाखाली वावरत आहेत. या कोरोनामुळे बळीराजासह उद्योsजकांनाही मोठा फटका बसला आहे. कोरोनाचे संकट असतानाही प्रशासनाच्या नियमावलीनुसार नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. भक्तांनी हे कोरोनाचे संकट लवकर दूर कर अशीच मागणी या नवरात्रीच्या जागरानिमित्त केली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळय़ाचीही दिंडी प्रदक्षिणा व तीर्थप्रसादाचे वाटप करून सांगता करण्यात आली. मंदिरामध्ये काकड आरती, नित्य पूजाअर्चा, भजन प्रवचन, कीर्तन, आदी कार्यक्रम झाले.

तालुक्मयात दुर्गामाता दौड मोठय़ा उत्साहात काढण्यात आली. दौडमध्ये धारकऱयांनी गर्दी करू नये, असे सूचना प्रशासनाच्या मदतीने देण्यात आली होती. या सुचनेची काटेकोर पालन करीत नऊ दिवस गावांगावामध्ये दौड काढण्यात आली. कोरोनाचे संकट असले तरी शिवभक्तांमध्ये अमाप उत्साह दिसून आला. या दौडमध्ये महिला व तरुणींचा सहभागही मोठय़ा प्रमाणात दिसून येत होता. दरवषी दुर्गामाता दौड ही विभागवार काढण्यात येते व एक दौड चार ते पाच गावांमध्ये फिरत असते. यंदा मात्र कोरोनामुळे गावामर्यादितच सर्वांनी दौडचे आयोजन केले होते.

रविवारी दौडच्या सांगता सोहळय़ानिमित्त अनेक गावांमध्ये शिवमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी गल्लीमध्ये आकर्षक अशा रांगोळय़ा काढल्या होत्या. येणाऱया दौडचे आरती ओवाळून स्वागत करण्यात येत होते.  सांगता सोहळय़ानिमित्त काही गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राबद्दल व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते.

किणये येथील दुर्गामाता दौडची रविवारी सांगता करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल चौधरी हे उपस्थित होते. प्रारंभी डॉ. कृष्णा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन नारायण पाटील, विठ्ठल रखुमाई मूर्ती पूजन रामलिंग गुरव, तुकाराम महाराज मूर्ती पूजन हेमंत पाटील, ज्ञानेश्वर मूर्ती पूजन विठ्ठल पाटील यांनी केले. शस्त्र पूजन श्रीनाथ बिजगर्णीकर व माल्लाप्पा मासेकर यांच्या हस्ते, मशालचे पूजन ज्ञानेश्वरी बिर्जे यांनी केले. प्रस्ताविक पुंडलिक दळवी यांनी केले. अनिल चौधरी व प्रभाकर हलगेकर यांचा सत्कार निवृत्ती डुकरे यांनी केला. यावेळी मारुती डुकरे, यल्लाप्पा गुरव, रामलिंग दळवी आदी उपस्थित होते. विठ्ठल रखुमाई मंदिर येथून दौडला सुरुवात करण्यात आली. गावातील सर्व गल्ल्यांमध्ये दौड फिरून महालक्ष्मी मंदिर येथे दौडची सांगता झाली. महालक्ष्मी मंदिरच्या आवारात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अनिल चौधरी यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श तरुणांनी घेऊन त्यांचे आचार विचार आपल्या जीवनात आचरणात आणा. तसेच हा भाग शेतीप्रधान आहे. तुमची असलेली शेती सुधारित पद्धतीने करा, असा सल्लाही चौधरी यांनी दिला.

बोकनूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ाची सांगताही झाली. ह. भ. प. नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. काकडी आरती, भजन, प्रवचन, कीर्तन, असे दैनंदिन कार्यक्रम झाले. सांगता सोंहळय़ाप्रसंगी नारायण सांगावकर, लक्ष्मण जाधव, राजाराम पाटील, मदन बिजगर्णीकर, परशराम पाटील, कल्लाप्पा जाधव, मारुती पाटील,परशराम जाधव, विठ्ठल पाटील, मारुती केसरकर, कृष्णा कांबळे, मंगेश पाटील, गावडू पाटील आदी उपस्थित होते.

कणबर्गी येथील काकडआरती सोहळय़ाची रविवारी टाळ, मृदुंग विठ्ठलनामाच्या गजरात सांगता झाली. नऊ दिवस विठ्ठल मंदिरामध्ये हा सोहळा झाला. ह. भ. प. धोडिंबा मुतगेकर, परशराम अष्टेकर, बसवाणी भंडगरगाळी, बाळू मालाई, कृष्णा दड्डीकर, लक्ष्मण काकतीकर, आप्पाजी सुंठकर, आदीसह महिला भजनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

खानापूर तालुक्यात गुरुवारी तिघांना कोरोनाची बाधा

Patil_p

भाग्यनगर येथील तरुण बेपत्ता

Patil_p

बाळेकुंद्री खुर्द चोरी तीन लाखाचा ऐवज लंपास

Patil_p

राज्य सरकारकडून अनलॉक 4.0 मार्गसूची जारी

Patil_p

युवकाच्या खून प्रकरणी चौकडीला अटक

Patil_p

आंतरराज्य वाहतूक सुरू पण रेल्वे वाहतूक मर्यादितच

Patil_p
error: Content is protected !!