तरुण भारत

युरोपियन टेनिस स्पर्धेत हंबर्ट विजेता

वृत्तसंस्था/ अँटवर्प

एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या युरोपियन खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या नवोदित युगो हंबर्टने एकेरीचे जेतेपद मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या डी मिनॉरचा पराभव केला.

या स्पर्धेतील झलेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात हंबर्टने आठव्या मानांकित डी मिनॉरचा 6-1, 7-6 (7-4) असा पराभव करत जेतेपद पटकाविले. एटीपी टूरवरील हंबर्टचे हे दुसरे जेतेपद आहे. गेल्या जानेवारीत हंबर्टने एटीपी टूरवरील आपले पहिले जेतेपद ऑकलंड स्पर्धेत पटकाविले होते. चार वर्षांपूर्वी या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला आणि या कालावधीत जेतेपद मिळविणारा हंबर्ट हा फ्रान्सचा तिसरा टेनिसपटू ठरला आहे. 2016 साली फ्रान्सच्या गॅसकेटने तर 2017 साली त्सोंगाने ही स्पर्धा जिंकली होती.

Related Stories

विंडीजला 32 वर्षांनंतर मालिकाविजयाची संधी

Patil_p

टोकियो ऑलिम्पिक तिकिटांचे अनावरण

Patil_p

अफगाणचा क्रिकेटपटू नजीब ताराकाईचे अपघाती निधन

Patil_p

ओस्टापेन्को, हॅलेप, व्हेरेव्ह, नदाल तिसऱया फेरीत

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा मिलमन विजेता

Patil_p

बोपण्णा-माराच उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p
error: Content is protected !!