तरुण भारत

साहित्य क्षेत्राने काळानुसार बदलायला हवे : श्रीरंग गोडबोले

ऑनलाईन टीम / पुणे :

एकेकाळी दिवाणखान्यात पुस्तकांनी भरलेले कपाट असणे हे समाजात प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात होते. आता दिवाणखान्यात स्मार्ट टीव्ही असणे हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. समाजाची बदलत चाललेली मानसिकता चिंताजनक आहे. अशा काळात वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी साहित्य क्षेत्राने काळानुसार बदलायला हवे. असे मत प्रसिद्ध गीतकार आणि निर्माते श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि नांदुरकर कुटुंबीय याच्या वतीने संपादन क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठीचा या वर्षीचा मोरेश्वर नांदुरकर संपादक उत्तेजन पुरस्कार नीता कुलकर्णी (पुणे) यांना आणि पुस्तक विक्रीच्या उत्तम कामगिरीसाठीचा मोरेश्वर नांदुरकर पुस्तक विक्रेता उत्तेजन पुरस्कार नाशिकच्या पुस्तक पेठेचे निखिल दाते यांना  गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. 

गोडबोले म्हणाले, नवे पुस्तक हातात घेऊन वाचणे हा वेगळाच अनुभव असतो. आजच्या वाचकांना ऑडिओ बुकच्या माध्यमातून वाचनाचा आनंद मिळवावा वाटतो उद्या एखादें नवीन माध्यम आल्यास ते ही  स्वीकारण्यासाठी साहित्य क्षेत्राने अद्ययावत असायला हवे.

यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी,  प्रमुख  कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह बंडा जोशी, मोरेश्वर नांदुरकर यांच्या पत्नी सुनीता नांदुरकर, मुलगी धनश्री कुलकर्णी, रसिक साहित्यचे शैलेश नांदुरकर आणि सहयोगीचे योगेश नांदुरकर उपस्थित होते.

Related Stories

सोलापूर : बार्शी आणि वैरागमध्ये लॉकडाऊन

triratna

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली

pradnya p

कंगणाच्या ड्रग्ज रॅकेटचा तपास सुरू

Patil_p

सोलापूर : क्रांती दिनी आडम मास्तर व अँड.एम.एच. शेख यांच्यासह 500 कार्यकर्ते अटक

triratna

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे झाले क्वारंटाइन

pradnya p

पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 394 केंद्रांमधून आपदा मदतकार्य

prashant_c
error: Content is protected !!