तरुण भारत

3 महिन्यात 5 कोटी स्मार्टफोन्सची जम्बो विक्री

विक्रीत शाओमीच नंबर वन, 5 स्थानांमध्ये चीनची बाजी: स्मार्टफोन विक्री सुसाट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोरोना महामारीमुळे गेले काही महिने प्रत्येक व्यवसायक्षेत्राला अडचणीचा सामना करावा लागला आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेची मात्र सध्या चलती असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यात स्मार्टफोन्सच्या विक्रीत कमालीचा उत्साह दिसला आहे.

सप्टेंबर तिमाहीअखेर स्मार्टफोनच्या विक्रीत 8 टक्के इतकी वाढ झाली आहे. यातही केवळ तीन महिन्यात अंदाजे 5 कोटी स्मार्टफोन्स विक्री झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आतापर्यंतच्या कालावधीत अशाप्रकारे कमी अवधीत पहिल्यांदाच इतक्या विक्रमी संख्येच्या स्मार्टफोन्सची विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. कनालिस या कंपनीने याबाबतची माहिती समोर आणली आहे. आतापर्यंत बाजारावर हुकूमत बजावणारी दक्षिण कोरीयातील सॅमसंग कंपनी मात्र या विक्रीच्या स्पर्धेत मागे पडली असल्याचे दिसून आले आहे. चीनच्या शाओमीने या विक्रीत अग्रस्थान मिळवून सॅमसंगला पछाडलं आहे.

इतर आघाडीवरच्या विक्रीतील यादीत चीनच्या कंपन्यांचाच बोलबाला दिसून आला असल्याचे माहितीत स्पष्ट झाले आहे. तिसऱया स्थानी विवो (चीन), चौथ्या स्थानी रियल मी (चीन) आणि पाचव्या स्थानी ओप्पो (चीन) ही कंपनी आहे. भारत-चीन यांच्यात मध्यंतरीच्या काळात तणाव वाढल्यानंतर सॅमसंग अग्रस्थानावर होती. त्याकाळात चिनी कंपन्यांच्या मोबाइल विक्रीत घसरण झाली.

दीड कोटी स्मार्टफोन्स खपणार ?

यंदाच्या उत्सवी काळात दीड कोटी स्मार्टफोन्सची विक्री इ-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनच्या माध्यमातून होईल. टेकआर्क या कंपनीने याबाबतचा वरील विक्रीचा अंदाज वर्तवला आहे. येणाऱया ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत मोठय़ा प्रमाणात स्मार्टफोन्सची विक्री वाढणार असल्याचा अंदाजही टेकआर्कने व्यक्त केला आहे.

Related Stories

सॅमसंग गॅलक्सी एम 42 लवकरच बाजारात

Patil_p

सॅमसंगकडून पिक-अप अन् ड्रॉप सेवा

Patil_p

लावाचा स्मार्टफोन बाजारात

Patil_p

रियलमी नार्जोला दमदार प्रतिसाद

Omkar B

रेडमीचा स्मार्ट बँड भारतीय बाजारात दाखल

Patil_p

एलजी मोबाईल उद्योगातून बाहेर

Amit Kulkarni
error: Content is protected !!