तरुण भारत

शेअर बाजार पहिल्याच दिवशी कोसळला

सेन्सेक्स 540 अंकांनी खाली, रिलायन्स इंडस्ट्रिज नुकसानीत

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक नकारात्मक संकेताच्या फटक्यामुळे आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने 540 अंकांची घसरण नेंदवली तर निफ्टीनेही 162 अंकांच्या घसरणीची नोंद केली. दिवसभराच्या व्यवहारात बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रिज यांच्या समभागांना मोठे नुकसान सोसावे लागले.

सोमवारी सकाळपासूनच बाजारात नकारात्मक वातावरण राहिले होते. दिवसअखेर सेन्सेक्सचा निर्देशांक 540 अंकांनी घसरून 40,145.50 वर तर निफ्टीचा निर्देशांक 162.60 अंकांनी घसरत 11,767.75 बंद झाला. बजाज ऑटोचे समभाग 6 टक्क्यापर्यंत नुकसानीत होते, त्यापाठोपाठ महिंद्रा आणि महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एसबीआय, ऍक्सीस बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रिज, आयसीआयसीआय बँक आणि टाटा स्टीलसारख्या समभागांच्या विक्रीचा दबाव बाजारात दिसला. ऍमेझॉनडॉट कॉमला फ्युचर ग्रुपसोबतच्या लवादाबाबत दिलासा मिळाल्याने याचा परिणाम रिलायन्सच्या समभागांवर जाणवला. रिलायन्सचे समभाग 4 टक्क्यापर्यंत घसरले होते. फ्युचर ग्रुप व रिलायन्स यांच्यातला व्यवहार थांबवण्याचा आदेश देण्यात आला आहे. दुसरीकडे बाजारात नेस्ले इंडिया, कोटक बँक, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग लाभात राहिले होते. जागतिक मिश्र संकेताचा परिणाम सकाळपासूनच शेअर बाजारावर दिसला होता. त्यामुळे काहीशी अनिश्चितता गुंतवणूकदारांमध्ये दिसत होती. युरोपसह इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याच्या कारणास्तव पुन्हा कडक लॉकडाऊन जारी करण्याच्या वृत्ताचा परिणाम बाजारात दिसला. धातू, ऑटो, रियल्टी आणि वित्त संस्थांच्या समभाग विक्रीत दुपारी जोर दिसला. जागतिक बाजारात शांघाई, टोकीयो आणि सेऊल बाजार नुकसानीसह बंद झाले तर युरोप बाजारही सुरूवातीला कमकुवतच होता.

Related Stories

मारुतीच्या विक्रीत 47 टक्क्मयांची घसरण

Patil_p

ट्रायचे ब्रॉडबँड स्पीड वाढविण्याचे ध्येय

Patil_p

ऍपल आज आयपॅड-वॉच आवृत्ती 6 करणार सादर

Patil_p

या कंपन्यांसाठी जीएसटी ई-बिल सक्तीचे?

Omkar B

मार्क झुकरबर्ग यांच्याकडे एफबीसह पाच कंपन्यांचे नेतृत्त्व

Patil_p

भारत गॅसची बुकिंगसाठी व्हॉट्सअप सुविधा

Patil_p
error: Content is protected !!