तरुण भारत

पेशावरमध्ये भीषण स्फोट; 5 ठार, 50 जखमी

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एका मदरशात झालेल्या भीषण स्फोटात 5 जण ठार झाले. तर 50 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
जखमींमध्ये दोन शिक्षक आणि 20 लहान मुलांचा समावेश आहे.

Advertisements

वरिष्ठ पोलीस अधीक्षक मन्सूर अमान यांनी या स्फोटाला दुजोरा दिला आहे. प्राथमिक अहवालानुसार स्फोटात 5 किलो सुधारित स्फोटक उपकरणाचा (आयईडी) वापर करण्यात आला होता. पोलिसांनी या परिसराला घेराव घातला असून, पोलीस याचा तपास करत आहेत. 

दरम्यान, लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी सांगितले की, 7 मृतदेह आणि 70 जखमींना या रुग्णालयात आणण्यात आले आहे.

Related Stories

हिंदूंचे बळजबरीचे धर्मांतर सुरूच : पाक संसद

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प यांचे बंधू रॉबर्ट यांचे निधन

datta jadhav

हाफिज सईदला 15 वर्षांचा तुरुंगवास

datta jadhav

जामताडाच्या ठकसेनांवर अमेरिकेचे संशोधन

Patil_p

कैदी नसल्याने तुरुंगांचे आलिशान हॉटेलात रुपांतर

Patil_p

अमेरिकेत उद्या अध्यक्षीय निवडणूक

Patil_p
error: Content is protected !!