तरुण भारत

एर्दोगान यांच्यानंतर इम्रान यांची मॅक्रॉन यांना धमकी

इस्लामाबाद

 तुर्कस्तानचे अध्यक्ष रेचेप तैयप एर्दोगान यांच्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना धमकी दिली आहे. फ्रान्सने मुस्लिमांना आणखीन भडकावू नये असे इम्रान यांनी म्हटले आहे. तर मॅक्रॉन यांची मानसिक स्थिती योग्य नसून त्यांनी विधाने करणे टाळावेत अशी टिप्पणी एर्दोगान यांनी केली होती.

Advertisements

मॅक्रॉन यांनी वादग्रस्त व्यंगचित्राला प्रोत्साहन देत जाणूनबुजून मुस्लिमांना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लामची माहिती नसतानाही मुस्लिमांना लक्ष्य करत मॅक्रॉन यानीं इस्लामोफोबियाला बळ पुरविल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे.

फ्रान्समधील एका इतिहासाच्या शिक्षकाची धार्मिक कट्टरवाद्याने हत्या केली होती. या शिक्षकाच्या हत्येनंतर मॅक्रॉन यांनी केलेल्या टिप्पणीच्या विरोधात इस्लामिक जगतात फ्रान्सच्या विरोधात वातावरणनिर्मिती केली जात आहे. समाजमाध्यमांवर सर्व प्रेंच उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू आहे. याचदरम्यान फ्रान्सने अरब देशांना प्रेंच उत्पादनांवरील बहिष्कार रोखण्याचे आवाहन केले आहे. 

मुस्लीम देशांकडून बहिष्कार आणि होत असलेल्या टीकेदरम्यान मॅक्रॉन यांनी फ्रान्सची सर्वधर्मसमभावाची प्रतिमा दर्शविणारे एक विधान प्रसारित केले आहे. आम्ही कधीच हार मानणार नाही, आम्ही शांततेच्या भावनेसह सर्व मतभेदांचा आदर करतो. आम्ही अभद्र भाषा स्वीकार करत नाही आणि योग्य चर्चेचा बचाव करतो. आम्ही नेहमीच मानवी प्रतिष्ठा आणि सार्वभौमिक मूल्यांच्या बाजूने राहू असे मॅक्रॉन यांनी नमूद केले आहे.

इम्रान यांचे पत्र

पाकिस्तानात अनेक अडचणींमध्ये सापडलेले पंतप्रधान इम्रान खान यांनी लोकप्रियता कायम राखण्यासाठी आता इस्लामोफोबियाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यांनी इस्लामबद्दलच्या द्वेषाच्या मुद्दय़ावरून फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग यांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी फेसबुकवरून इस्लामोफोबियाशी संबंधित पोस्ट हटविण्याची मागणी केली आहे.

Related Stories

छत, भिंत नसणारे हॉटेल

Patil_p

पाकिस्तानात गटारीचे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Patil_p

मेक्सिकोमध्ये 5,714 नवे कोरोना रुग्ण; 579 मृत्यू

Rohan_P

ट्रम्पपुत्रालाही लागण

Patil_p

‘एस-400’चे क्षेपणास्त्र लक्ष्य हुकून कोसळल्याचा व्हिडीओ

Patil_p

युरोप : संकट वाढतेच

Patil_p
error: Content is protected !!