तरुण भारत

मेहबुबा मुफ्तींना स्वपक्षीयांचाच धक्का

श्रीनगर / वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वीच ‘तिरंग्याचा मान राखणार नाही’ अशी प्रतिज्ञा केलेल्या पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना त्यांच्याच पक्षाच्या तीन नेत्यांनी धक्का दिला आहे. त्यांच्या तिरंग्यासंबंधीच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत या नेत्यांनी पक्ष सोडल्याची घोषणा सोमवारी केली. टी. एस. बाजवा, हसन अली वाफा आणि बेद महाजन अशी नेत्यांची नावे असून ते ज्येष्ठ नेते आहेत.

तिरंग्यासंबंधीच्या विधानांमुळे मुफ्ती यांची सर्व स्तरांमधून निर्भर्त्सना होत आहे. अनेक राजकीय पक्षही वाचाळपणामुळे त्रस्त आहेत. ‘गुपकार’ या त्यांच्या पाच पक्षांच्या युतीमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांनीही या विधानांवर नापसंती व्यक्त करताना स्वतःला त्यांपासून दूर राखले आहे.

Related Stories

दिल्लीतील हिंसाचारात आप-काँग्रेसचा हात

Patil_p

शिरोमणी अकाली दलानंतर ‘जेजेपी’ची साथ सोडणार ?

Patil_p

आसाममध्ये 1616 उग्रवाद्यांचे आत्मसमर्पण

Patil_p

मुलांचा मृत्यू किरकोळ घटना नव्हे!

Patil_p

आजपासून पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागले

Patil_p

नियंत्रण रेषेजवळ दिसले पाकिस्तानी लढाऊ विमान

datta jadhav
error: Content is protected !!