तरुण भारत

बेतकी खांडोळा येथे दूधवाहू कंटेनरने दुचाकीला ठोकरल्याने एक ठार

वार्ताहर/ माशेल

बेतकी खांडोळा येथील हळदणवाडा गणपती मंदिराजवळ दुधवाहू कंटेनरने दोन दुचाकींना चिरडल्याने दुचाकीचालक ठार झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. नरेश मोहन नाईक (40,बांधार कांवगाळ सावईवेरे) असे मृत युवकाचे नाव आहे. समीर साखळकर (26, पणजी) व अपर्णा नामदेव नाईक(26, गिमोणे बेतकी) अशी जखमींची नावे आहेत. सदर अपघात काल सोमवारी सकाळी 7.15 वा. सुमारास घडला.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश हा आपल्या ज्युपीटर जीए 05 क्यू 3019 ने सावईवेरेहून बेतकीच्या दिशेने जात होता. यावेळी समीर साखळकर व अपर्णा नाईक दोघेही डीओ जीए 07 जे 8438 दुचाकीसह  त्याचदिशेने जात होती. यावेळी माशेलहून खांडोळय़ाच्या दिशेने समोरून विरूद्ध दिशेने येत दुधवाहू कंटेनर टाटा मिनी टेम्पो एस जीए 04 टी 5092 सरळ धडक दोन्ही दुचाकीना दिली. यात दोघे दुचाकीचालकांसह प्रवासी महिलाही चिरडली गेली. तिघांनाही अत्यवस्थ अवस्थेत बेतकी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता बांबोळी येथील गोमेकॉत पाचारण करण्यात आले. बांबोळी येथे उपचार घेत असताना नरेश नाईक यांचा मृत झाला. येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 याप्रकरणी दुधवाहू कंटेनरचा चालक संतोष गावकर (37,निरंकाल) याला  फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन हाकून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भा.दं.सं. 279, 337,338,304 (अ) कमलाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिला उपनिरीक्षक प्रतिक्षा गावकर अधिक तपास करीत आहे.

मयत नरेश नाईक हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा म्हणून सावईवेरे भागात परिचित असून तो भूतखांब केरी पठारावरील नायनल 66 प्रकरणी हुतात्मा झालेल्या निलेश नाईक याचा सख्खा भाऊ होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी व मुलगी असा परीवार आहे. तो डिचोली येथील एका आस्थापनात कामाला होता. रोज तो याच मार्गावरून माशेलमार्गे कामाला जात असे. काल सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

एटीएमद्वारे पैसे चोरणाऱया चोरटय़ांना म्हापशात अटक

Patil_p

गेल्या चोवीस तासांत हलका पाऊस

Patil_p

मडगाव पालिकेच्या रोजंदारीवरील कामगारांचा कामावर बहिष्कार

omkar B

शाळा सुरु करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

Patil_p

कोवीड काळात वाळपईच्या शहरात भाजी,फळविक्री दुकांने वाढली.

Patil_p

कोरोनाच्या धास्तीमुळे बाणस्तारी बाजाराला ग्राहक भेटेना

Patil_p
error: Content is protected !!