तरुण भारत

बेंगळूर: नवीन कोविड रुग्णलयाला डॉक्टर मिळेनात

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन इन्फोसिस फाऊंडेशनच्या सहकार्याने शिवाजीनगर येथे सर्व सुविधांनी युक्त कोरोना रुग्णालय बांधले गेले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी २६ ऑगस्ट रोजी ब्रॉडवे रोडवरील रुग्णालयाचे उद्घाटन केले. १०० खाटांच्या या रुग्णालयाच्या निर्मितीस सुमारे चार महिने लागले. परंतु रुग्णालयात मोजकेच डॉक्टर आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने जुलै महिन्यातच डॉक्टर आणि तज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी अर्ज मागविले होते. परंतु आतापर्यंत डॉक्टर सापडले नाहीत. अर्जदारांच्या अनुपस्थितीमुळे नियुक्ती प्रक्रिया प्रलंबित आहे.

बेंगळूर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (बीएमसीआरआय) चे निवासी डॉक्टर, पदव्युत्तर (पीजी) विद्यार्थी आणि फेलोशिपचे विद्यार्थी हे कसे तरी हॉस्पिटल चालवत आहेत.

दरम्यन एमबीबीएस फिजीशियन, कार्डियोलॉजिस्ट, पल्मोनोलॉजिस्ट, नेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, फार्मासिस्ट, क्रिटिकल केअर युनिट स्पेशलिस्ट इत्यादी ७३ जागांसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. परंतु सुरक्षा रक्षक आणि नर्सिंग कर्मचार्‍यांना वगळता अद्याप कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

Related Stories

बेंगळूर: बेड रूग्णांवर उपचार करत नाहीत

Shankar_P

कर्नाटकात गुरुवारी ७ हजाराहून अधिक रुग्णांची भर

Shankar_P

कर्नाटकातही लव्ह जिहादाविरोधी कायदा येणार

Patil_p

कर्नाटकात शुक्रवारी १० हजाराहून अधिक जणांना डिस्चार्ज

Shankar_P

मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना

omkar B

कर्नाटक: द्वितीय पीयूसी पुनर्मूल्यांकन निकाल जाहीर

triratna
error: Content is protected !!