तरुण भारत

पुलवामात दहशतवाद्याचा खात्मा; एकाचे आत्मसमर्पण

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आले. त्यावेळी घाबरलेल्या दहशतवाद्याच्या साथीदाराने सुरक्षा दलाकडे आत्मसमर्पण केले. 

Advertisements

जम्मू पोलीस आणि सीआरपीएफच्या एका पथकाने  पुलवामा जिल्ह्यातील त्रालच्या नूरपोरा भागात सोमवारी संध्याकाळी शोधमोहीम हाती घेतली होती. शोधमोहीमेदरम्यान एका घरात लपून बसलेल्या अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय जवान आणि पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर घाबरलेल्या त्याच्या साथीदाराने भारतीय जवानांकडे आत्मसमर्पण केले. 

Related Stories

…तर भारतासाठी चीनविरोधात लष्करी कारवाईचा मार्ग खुला

datta jadhav

पंजाब : उपसभापती अजायब सिंह, मंत्री गुरुप्रीत कांगड यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

एनटीपीसी पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणार

Patil_p

देशात 96,551 नवे कोरोना रुग्ण, एकूण रूग्णसंख्या 45.62 लाखांवर

datta jadhav

नवी दिल्ली : लाजपत नगर मार्केटमधील कपड्यांच्या शोरूममध्ये भीषण आग

Rohan_P

अखेरच्या टप्प्याचे मतदान आज

Patil_p
error: Content is protected !!