तरुण भारत

कोल्हापूर : वारणा महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरूवात

प्रतिनिधी / वारणानगर

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये “दक्षता जनजागृती सप्ताह”, विविध उपक्रमाने संपन्न होत आहे. या निमित्ताने आज प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी सत्यनिष्ठा शपथ सादर …केली. १०० हून अधिक कर्मचार्यांनी यावेळी भ्रष्टाचार विरोधातील लढ्यात सहभाग घेण्यासंदर्भात शपथ घेतली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ऑनलाइन सहभाग घेऊन व्याख्याने , चित्र- पोस्टर, घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्राचार्य डॉ प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की,” देशाच्या आर्थिक, राजनीतिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार ही एक मोठी समस्या असून शासकीय-निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार मुक्त कार्य करणे गरजेचे आहे. ठरलेल्या वेळेत आपल्या कामावरती उपस्थित न होणे हाही भ्रष्टाचाराचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि सत्य निष्ठेने आदर्श कामकाज पद्धती स्वीकारावी. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढ्यात सर्वसामान्य जनतेने ही साथ देण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी स्वागत प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ.एस. एस. खोत यांनी केले. समारंभ संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.सी. आर. जाधव यांनी केले. डॉ. आर. पी. कावणे यांनी आभार मानले. राष्ट्रीय छात्र सैनिकेंच्या प्रमुख प्रा.सौ. जयंती गायकवाड, प्रबंधक बाळासाहेब लाडगांवकर, समन्वयक प्रा. दिलीप घाडगे, प्रा.एस. के. आतिरकर,प्रा. वैभव बुड्ढे, प्रा. डी. एस. पवार व सहकारी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Related Stories

ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत गगनबावड्याची वैदेही पाध्ये प्रथम

Shankar_P

संचारबंदी काळात परप्रांतीयांना आमदार पी.एन. पाटील यांचा मदतीचा हात

triratna

कोल्हापूर : कोव्हिड केअर सेंटरमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या त्या सहा जणांवर गुन्हा दाखल

triratna

विश्वनाथ वसंत पुजारी यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

Shankar_P

‘अलमट्टी’ तून अडीच लाख क्यूसेक विसर्ग

triratna

शाहूवाडी वनाधिकाऱयांची चौकशी करा

triratna
error: Content is protected !!