गोवा: गोवाफाॕरवर्ड पक्ष आणि आमदार विजय सरदेसाई हा एक गोव्याला लागलेला व्हायरस आहे – आमदार दयानंद सोपटे याचा मांद्रे येथे घेतलेल्या पञकार परिषदेत आरोप. गोवा फाॕरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी मांद्रे मतदारचे आमदार दयानंद हे मतदार मतदारसंघासाठी लागलेला व्हायरस आहे असा आरोप दीपक कळंगुटकर यांच्या गोवा फाॕरवर्ड पक्षाच्या प्रवेश कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचे समाचार घेतला . यावेळी दयानंद सोपटे यांच्या सोबत मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब , पेडणे मतदारसंघ भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, गोवा भाजप अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष सिध्देश पेडणेकर , मांद्रे मतदारसंघ भाजप उपाध्यक्ष अनंत गडेकर उपस्थित होते.

