तरुण भारत

सरकारी दवाखान्यात दिव्यांग सेवा केंद्र चालु करणासाठी प्रयत्न करणार

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची ग्वाही

वार्ताहर / कुंभोज

हातकणंगले व शिरोळ तालुक्यात अंदाजे 45 हजार अपंग बांधव आहेत. केंद्र सरकारने 21 प्रकारचे दिव्यांग यादी जाहीर केली आहे .त्यामुळे अपंग संख्या वाढु शकते पुढचा विचार केला तर प्रत्येक तालुक्यातील आरोग्य केंद्रात शहरात शासकीय रुग्णालयात अपंग सेवा केन्द्र चालु करावे अशी मागणी प्रहार अपग संघटनेचा वतीने आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे करण्यात आली.

इचलकरंजी IGM ला उपजिल्हा रुग्णालयचा दर्जा आहे. जर महिन्याला कॅम्प घेऊन अपंग सर्टिफिकेट दिले तर सोयिस्कर होईल, अशि माहिती राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हातकणंगले तालुका प्रहार अपंग संघटना यांच्या वतीने देण्यात आली. यावेळी त्यांनी अपंग व्यक्तींचा विचार करता त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना योजनांचा लाभ मिळावा यासाठी लवकरात लवकर योग्य नियोजन करून दिव्याग सेवा केंद् अनेक तालुका, शहराचा ठिकाणी चालु करण्यात येईल असे सांगितले.

इचलकरंजी येथील प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या अध्यक्ष सुनिल पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील CPR हॉस्पिटलमध्ये प्रत्येक तालुक्यातील ग्रामिण भागातुन अपंग बांधव CPR मध्यें UDID सर्टिफिकेट साठी येत असतात आठवड्यातून बुधवारी १०ते २ वेळेत तपासणी केली जाते ऑनलाईन UDID कार्ड सर्टिफिकेट दिले जाते पण ज्या अपंग बांधवांनकडे जुने ऑफलाईन सर्टिफिकेट आहे ते ऑनलाईन UDID करण्यासाठी प्रथम अपॉइंटमेंट घेण्यासाठी सीपीआरला जावे लागते नंतर तपासणीला जावे लागते पण आताचं कोरोनाचा विचार करता अपंग (पोलिवो) विचार करता अपंग बांधवांची रोगप्रतिकारक शक्ती असते काहींना चालता बसता येत नाही मतिमंद मुलांच्या नातेवाईकना मुलांना कोल्हापूर CPR येण्याजाण्याचा त्रास होतो इचलकरंजी शहर मोठे आहे.

हातकणंगले व शिरोळ तालुक्यात अंदाजे 45 हजार अपंग बांधव आहेत केंद्र सरकारने 21 प्रकारचे दिव्यांग यादी जाहीर केली आहे त्यामुळे अपंग संख्या वाढु शकते पुढचा विचार केला तर प्रत्येक तालुक्यातील आरोग्य केंद्रात शहरात शासकीय रुग्णालयात चालु करावे इचलकरंजी IGM उपजिल्हा रुग्णालयचा दर्जा आहे जर महिन्याला कॅम्प घेऊन अपंग सर्टिफिकेट दिले तर सोयिस्कर होईल हि माहिती राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दिली. ते आरोग्यमंत्री यड्रावकर हे इचलकरंजी येथे यड्रावकर बालाजी बेकरीचा उद्धघाटनला आले होते, आरोग्य राज्यमंत्री यांनी प्रथम अपंग बांधवांचे निवेदन घेऊन चर्चा केली व बालाजी बेकरीचे उध्दघाटन केले त्यामुळे अपंग बांधवांच्यात आनंदाचे वातावरण पसरले होते.त्यावेळी प्रहार उपाध्यक्ष इरफान बागवान, खजिनदार अनिल विजयनगरे, महिला अध्यक्षअंजना सुतार हजर होते.

Related Stories

जि.प. सदस्य राहुल आवाडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटिव्ह

Shankar_P

कोल्हापूर : वळीवडेत गावठी दारूसाठा जप्त; तरुणावर गुन्हा

triratna

कोल्हापूर : पदवीधर व शिक्षक मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

triratna

चांदोली धरणातून विसर्ग वाढला, वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shankar_P

खासबाग परिसरातील अतिक्रमण हटविले

triratna

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन

triratna
error: Content is protected !!