तरुण भारत

बिहारच्या निवडणुकीत पुणेकर कार्यकर्त्यांचा प्रचार!

  • लोकजनशक्ती पार्टीच्या पुण्याच्या कार्यकर्त्यांना चमत्काराची आशा


ऑनलाईन टीम / पुणे : 


बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचारात  पुण्यातील लोकजनशक्ती पार्टीच्या पुण्याच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये जाऊन हिरीरीने प्रचार केला. सोमवारी या प्रचाराची सांगता झाली.

लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर होणाऱ्या या निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकून रामविलास पासवान यांना आदरांजली वाहायची, असा निश्चय करून कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. 


पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पटना, नालंदा, गया, वैशाली, राजगिर आदी भागात प्रचार केला. पटना येथील पक्ष कार्यालयात रामविलास पासवान यांच्या प्रतिमेला या कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण केला. या दौऱ्यात प्रदेश सचिव अण्णासाहेब कांबळे, प्रवक्ते के. सी. पवार, सातारा जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, पुणे उपाध्यक्ष संजय चव्हाण, प्रमोद पासवान आदी कार्यकर्ते सहभागी झाले. प्रचार सभा आणि बैठकांना उपस्थिती लावली. तसेच घरोघर जाऊन प्रचार देखील केला. 


‘लोकजनशक्ती पार्टीच्या बिहारच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा पण केला आहे. त्यात योगदान देण्यासाठी आम्ही प्रचाराला गेलो होतो. यावेळी या निवडणुकीत बिहारमध्ये चमत्कार घडण्याची आशा आहे, असे संजय आल्हाट यांनी सांगितले.                                                                                                   

Related Stories

सोलापूर जिल्ह्यात दहावीचा निकाल 97.53 टक्के

triratna

दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा

datta jadhav

सोलापूर : खून प्रकरणातील वृध्दास VC व्दारे जामीन

triratna

डॉ. द. दि. पुंडे यांना ‘मसाप’चा जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर

pradnya p

आरोग्याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात – आरोग्य मंत्री टोपे

triratna

संग्रामसिंग देशमुख पुणे पदवीधरचे भाजप उमेदवार

triratna
error: Content is protected !!