तरुण भारत

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरु

वार्ताहर / गोकुळ शिरगाव

तब्बल सात महिन्यानंतर कोल्हापूर मुंबई विमानसेवा आजपासून सुरुवात झाली. मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे कोल्हापूर मुंबई विमानसेवा 14 मार्च पासून पुर्ण बंद झाली होती. ही विमानसेवा गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याने कोल्हापूर मुंबई विमान प्रवास करणाऱ्या लोकांचे सात महिन्यासाठी हाल झाले. पण आज ही विमानसेवा तब्बल सात महिन्याने सुरळीतपणे चालू झाली याला प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळाला. यामध्ये आज एकूण 30 प्रवासी मुंबईवरून आले तर कोल्हापूरहून मुंबईसाठी 25 प्रवासी रवाना झाले. हे सर्व बुकिंग ऑनलाइन झाले होते. उद्याचे असणारे फ्लाईट हि फुल्ल आहे अशी माहिती विमान प्राधिकरण चे अधिकारी कमल कुमार कटारिया यांनी दिली.

आज टू जेट एअरलाइन्स विमान दुपारी 02:45 वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले व तीन वाजून पाच मिनिटांनी मुंबईसाठी रवाना झाले. या विमानातून सध्या कोल्हापूरमध्ये जोतिबाच्या नावाने चांगभलं चालू असलेल्या सिरियलचे दिग्दर्शक महेश कोठारे हे या विमानातून आल्याने तिथे जमलेल्या प्रवाशांना कोठारी यांना पाहण्याचे आनंद झाला.

Related Stories

शाहूवाडीत आरोग्य परिचारिकेचा पतीकडून खून

Shankar_P

कोल्हापूर : ‘स्वयंम-चेतना’चे ‘वर्क फ्रॉम होम’

Shankar_P

तुकाराम मुंढेंनी स्विकारला नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार

prashant_c

पूरबाधित क्षेत्रातील 380 गावे रडारवर

triratna

मिरा भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

pradnya p

‘कुंभी’ साखरचे साडे सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

triratna
error: Content is protected !!