तरुण भारत

बेंगळूर: वाहतूक पोलिसांनी जमा केला ३.६३ कोटी दंड

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर ट्रॅफिक पोलिसांनी गेल्या आठवड्यात शहरातील वाहतुकीचे नियम न पाळल्याबद्दल तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांकडून ३,६३,०७,३०० रुपये दंड जमा केला आहे.

ट्रॅफिक सह पोलिस आयुक्त बी. आर. रविकांत गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार हा दंड १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांनी वसूल केला आहे.

हेल्मेट न घातल्याबद्दल दुचाकीस्वारांकडून दंड म्हणून १.०२ कोटी रुपये वसूल करण्यात आले, तर मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्याबद्दल ६२.३८ लाख दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, सुमारे १०,०७७ लोक वाहतुक सिग्नल मोडताना पकडले गेले. एकाच वेळी ८१ वेगवेगळ्या प्रकरणी एकूण ८६,३८० प्रकरणे दाखल केली गेली आहेत.

Related Stories

कर्नाटक: शेतकऱ्यांना विशेष कांदा निर्यात करण्याची परवानगी

triratna

कर्नाटकात कोरोना चाचण्यांची संख्या ९० लाखावर

Shankar_P

पोटनिवडणुकीचा आज होणार फैसला

Patil_p

कर्नाटक: सिद्धरामय्या, रेवण्णा फ्रीडम पार्क येथे निदर्शनास उपस्थित

triratna

कर्नाटकात एका दिवसात ८,६५५ जणांना कोरोना संसर्ग

Shankar_P

कर्नाटकात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता: आयएमडी

triratna
error: Content is protected !!