तरुण भारत

मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा

प्रतिनिधी /बेळगाव

वंशाचा दिवा मुलगाच. हा समज दूर करत येळ्ळूर येथे मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देत सर्व विधी पार पाडले. येळ्ळूरच्या अनुसुया निंगाप्पा मोटराचे यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा आणि पती व पाच मुली आहेत.

मात्र परशराम मोटारचे या भावाच्या इच्छेखातर मुलींनी पुढाकार घेवून आईच्या पार्थिवाला खांदा दिला. जयश्री बाळाराम पाखरे (वडगाव), सरस्वती शिवाजी जाधव (येळळूर), वसुंधरा गणपत पाटील (बाची), मुक्ता रमेश सुजे (यमकनमर्डी), डॉ. सरिता राम गुरव (कुदेमानी) या पाच जणींनी आईच्या पार्थिवाला खांदा देवून सर्व  विधी पार पाडले. पार्थिवासमोर सूप धरुन जाण्याच्या प्रथेला सुध्दा या ठिकाणी फाटा देण्यात आला. या पुरोगामी विचाराची पंचक्रोषीत चर्चा होत आहे.

Related Stories

बेंगळूर: सिद्धरामय्या यांची प्रकृती स्थिर

triratna

स्तवनिधी ब्रह्मदेवाची 24 रोजी यात्रा

Patil_p

दुचाकी अपघातात अकोळचा युवक ठार

Patil_p

बेळगावातून क्वारंटाईन मधून 79 जणांची सुटका

Rohan_P

आरपीडी-बसवेश्वर चौकातील ट्रफिक सिग्नल सुरू

Patil_p

निशिकांतच्या मोबाईलमधून मेसेज कोणी केला?

Patil_p
error: Content is protected !!