तरुण भारत

इटनाळमध्ये जावयाकडून सासऱयाचा खून

वार्ताहर/ चिकोडी

अपत्य होत नसल्याच्या कारणावरुन मारहाण करत असलेल्या जावयापासून आपल्या मुलीस वाचविण्यास गेलेल्या सासऱयावर जावयाने कूपनलिकेच्या पाईपने हल्ला करुन खून केल्याची घटना चिकोडी तालुक्यातील इटनाळ येथे रविवारी रात्री 9 च्या सुमारास घडली. सिध्दाप्पा रायाप्पा खोत (वय 58, रा. करोशी) असे मृताचे नाव तर बाळेश श्रीकांत बोरण्णावर (वय 42) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

Advertisements

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळेश बोरण्णावर याचा विवाह करोशी येथील सिध्दाप्पा खोत यांच्या मुलीशी 10 वर्षापूर्वी झाला होता. बाळेश हा निवृत्त सैनिक असून त्याच्यात व पत्नीमध्ये अपत्य होत नसल्याच्या कारणावरुन सदैव भांडणे होत होती.

रविवारी सिध्दाप्पा हे दसऱयाचा फराळ घेवून मुलगी व जावयाला भेटावयास गेले होते. रात्री 9 च्या सुमारास पती व पत्नीमध्ये पुन्हा एकदा भांडण सुरु झाले. यावेळी बाळेश हा आपल्या मुलीस मारत असल्याचे पाहून सिध्दाप्पा हा यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी बाळेश याने पीव्हीसी पाईपने सिध्दाप्पा यांनाही मारहाण केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने चिकोडीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच घटनास्थळी चिकोडी पोलिसांनी धाव घेत संशयित बाळेश यास अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कोठडीत केली. सिध्दाप्पा यांचा पुतण्या सुधाकर खोत याने फिर्याद दिली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

चिकोडी, निपाणी परिसरात दिवाळी उत्साहात

Patil_p

प्रवाशाला रेल्वे पोलीसांनी बाहेर काढले मृत्यूच्या दाढेतून

Patil_p

येळ्ळूर गणपत गल्ली गणेशोत्सव मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ

Amit Kulkarni

पोलीस-आरटीओकडून होणारा त्रास थांबवा

Patil_p

दुर्गामाता दौडला सशर्त परवानगी द्या

Amit Kulkarni

बेळगावचे विमानतळ राज्यात दुसऱया क्रमांकावर

Patil_p
error: Content is protected !!