तरुण भारत

ऑस्ट्रेलियाच्या बार्टीचे अग्रस्थान कायम

वृत्तसंस्था / पॅरीस

डब्ल्यूटीए टूरवरील महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीची घोषणा सोमवारी करण्यात आली असून ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. दरम्यान बेलारूसच्या साबालेन्काने ओस्ट्राव्हातील स्पर्धा जिंकून या मानांकन यादीत 11 वे स्थान पटकाविले आहे.

Advertisements

झेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत 22 वर्षीय साबालेन्काने आपल्याच देशाच्या व्हिक्टोरिया अझारेंकाचा अंतिम सामन्यात सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले होते. डब्ल्यूटीए टूरवरील साबालेन्काचे हे सातवे जेतेपद आहे. ताज्या मानांकन यादीत अमेरिकेची सेरेना विल्यम्स 10 व्या तर बेलारूसची अझारेंका 13 व्या स्थानावर आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या फेब्ा्रgवारी महिन्यापासून ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने एकही सामना खेळला नसला तरी तिने मानांकनातील आपले अग्रस्थान कायम राखले आहे.

महिला टेनिसपटूंच्या एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 8717 गुणांसह पहिल्या, रूमानियाची हॅलेप 7255 गुणांसह दुसऱया, जपानची ओसाका 5780 गुणांसह तिसऱया, अमेरिकेची केनिन 5760 गुणांसह चौथ्या, युक्रेनची स्विटोलिना 5260 गुणांसह पाचव्या, झेकची प्लिसकोव्हा 5205 गुणांसह सहाव्या, कॅनडाची अँड्रेस्क्यू 4555 गुणांसह सातव्या, झेकची क्विटोव्हा 4516 गुणांसह आठव्या, हॉलंडची बर्टन्स 4505 गुणांसह नवव्या, अमेरिकेची सेरेना विल्यम्स 4080 गुणांसह दहाव्या, बेलारूसची साबालेन्का 4045 गुणांसह 11 व्या, स्वीसची बेनसिक 4010 गुणांसह 12 व्या, बेलारूसची अझारेंका 3426 गुणांसह 13 व्या स्थानावर आहे.

Related Stories

आरसीबीविरुद्ध केकेआरची फर्ग्युसनवर भिस्त

Patil_p

27 क्रीडा फेडरेशन्सना क्रीडा मंत्रालयाची मान्यता

Omkar B

कोरोनाग्रस्तांसाठी कोहली, डिव्हिलीयर्सकडून मदत

Patil_p

सायकलिंगमध्ये पूजाचा सुवर्ण चौकार

Patil_p

पृथ्वी शॉचे नाबाद द्विशतक, यादवचे शतक

Amit Kulkarni

आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी पाच महिला मल्लांची निवड

Patil_p
error: Content is protected !!