तरुण भारत

पाकची नाचक्की! फ्रान्समध्ये नसलेल्या राजदूताला बोलावले माघारी

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामिक दहशतवादाप्रकरणी केलेल्या वक्तव्याविरोधात पाकिस्तानी संसदेत निंदा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी फ्रान्समधून पाकिस्तानी राजदूत परत बोलवण्याचा प्रस्ताव सादर केला. विरोधी पक्षासह सर्व सदस्यांनी तो एकमताने मंजूर केला. मात्र, पाकिस्तानचा फ्रान्समध्ये राजदूत नाही हेच कोणाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे पाकिस्तानची जगासमोर नाचक्की झाली.

Advertisements

मागील तीन महिन्यांपासून फ्रान्समध्ये पाकिस्तानचा राजदूत नाही. तेथील राजदूत मोईन उल हक यांना तीन महिन्यापूर्वी पाकिस्तानात बोलावून त्यांची नियुक्ती चीनचे राजदूत म्हणून केली होती. हे लक्षात नसल्याने कुरैशी यांनी राजदूताला माघारी बोलावण्याचा प्रस्ताव दिला. परराष्ट्रमंत्री कुरैशी यांच्या या चुकीने ते त्यांच्या मंत्रालयाबाबत किती अनभिज्ञ आहेत हे जगासमोर आले. 

मॅक्रॉन यांच्या इस्लामविरोधी विधानामुळे जगभरातील मुस्लीम देश त्यांचा निषेध व्यक्त करत आहेत. त्यात पाकिस्तान आणि बांगलादेश यांचाही समावेश आहे. दरम्यान, कुरैशी यांना आपला राजदूत फ्रान्समध्ये नसल्याची माहिती होती. पण, इस्लामचा कट्टर अनुयायी दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांनी संसदेला फ्रान्समध्ये आपला राजदूत नसल्याची माहिती सांगितली नाही, असे पाकच्या डॉन या वृत्तपत्राने म्हटले आहे.

Related Stories

मोठी बातमी : 19 एप्रिलपासून होणाऱ्या मेडिकलच्या परीक्षा आता जूनमध्ये होणार

triratna

नेपाळमध्ये कोरोनाचा कहर, ओलींचे दुर्लक्ष

Patil_p

ज्यो बिडेन यांनी ड्रग टेस्ट करवून घ्यावी!

Patil_p

… तर अमेरिकेत होऊ शकतात 2 लाखांहून अधिक मृत्यू

prashant_c

दिल्लीत आज रात्रीपासून 6 दिवसांचा लॉकडाऊन!

pradnya p

उत्तरप्रदेशात दोन साधूंची हत्या

prashant_c
error: Content is protected !!