तरुण भारत

दिल्ली : पुढील आदेशापर्यंत सर्व शाळा बंद रहाणार : मनीष सिसोदिया

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील सर्व शाळा बंद राहतील तसेच शाळा उघडण्याची तारीख ही अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज दिली. 

Advertisements


ते म्हणाले, दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शिक्षक आणि पालक बैठकांत मिळालेल्या फीडबॅकमध्ये शाळा बंद ठेवण्याचा विचार मांडण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीचे सर्व सरकारी आणि खासगी शाळा पुढच्या आदेशापर्यंत बंदच राहतील. मात्र, सध्या सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण चालू राहील, असेही सिसोदिया यांनी यावेळी सांगितले. 


जगभरात ज्या ज्या ठिकाणी कोरोना संक्रमणा दरम्यान शाळा उघडण्यात आल्या आहेत तिथे लहान मुलांमध्ये संक्रमण वाढल्याचे दिसून आले आहे. अशा वेळी दिल्लीच्या शाळा उघडण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

Related Stories

सर्वात कमी उंचीची वकील

Patil_p

पुलवामामध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

देशात 24 तासात 9983 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

पंजाबमध्ये कोरोना बाधितांनी ओलांडला 2.51 लाखांचा टप्पा

pradnya p

अमेरिकेने पॅसिफिक महासागरात तैनात केल्या तीन विमानवाहू नौका

datta jadhav

विश्व हिंदू महासभा प्रदेशाध्यक्षांची हत्या

Patil_p
error: Content is protected !!