तरुण भारत

कोल्हापूर : सावे येथे तीन वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक

प्रतिनिधी / शाहुवाडी

सावे तालुका शाहुवाडी येथील यशवंत बापू नलवडे वय 55 याने तीन वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली असून याबाबत शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. तर संबंधित नराधमास शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावे तालुका शाहूवाडी येथील 55 वर्षीय यशवंत बापू नलवडे यांने दारात खेळत असलेल्या गावातीलच तीन वर्षाच्या बालिकेला आपल्या राहत्या घरात बोलवून लैंगिक अत्याचार केला सदरची घटना पीडित मुलीने  घरापासून काही अंतरावर शेतात काम करत असलेल्या आपल्या आईला सांगितली ही घटना समजताच पिडीतिच्या आईने याबाबत शाहूवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून शाहूवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन संबंधित नराधमाला ताब्यात घेतले तर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने सर्वच स्तरातून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता आपल्या नाती समान असणाऱ्या बालिकेवर हात टाकणाऱ्या  नराधमाला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी चर्चा नागरिकांतून पुढे येऊ लागली आहे.
दरम्यान सावे गावात जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर  शाहूवाडी चे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख ,पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सराटे आदींनी भेट देऊन पंचनामा केला.

Advertisements

Related Stories

‘मराठा महासंघ जिल्ह्यात एक लाख तरूणांचे डिजीटल जाळे तयार करणार’

Abhijeet Shinde

लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत विचार सुरू : मुख्यमंत्री

Rohan_P

`स्कूल कनेक्ट’ची `पॉलिटेक्निक’ला `पॉवर’!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : केंद्र शासनाने सॉफ्टलोनऐवजी ऊसाला प्रतिटन ५०० ते ६०० रु. अनुदान द्यावे

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट, 31 बाधित

Abhijeet Shinde

अहमदनगरमध्ये एसटीलाच गळफास घेत चालकाची आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!