तरुण भारत

सौदी अरेबियाचा पाकिस्तानला दणका

नकाशातून गिलगिट-बाल्टिस्तानला हटविले

वृत्तसंस्था / रियाध

Advertisements

सौदी अरेबियाने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. सौदी सरकारने पुढील महिन्यात होणाऱया जी-20 परिषदेसाठी एक विशेष नोट सादर केली आहे. याच्या मागील भागात जी-20 देशांचे नकाशे आहेत. विशेष बाब म्हणजे यात काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तानला पाकिस्तानचा हिस्सा दाखविण्यात आलेले नाही. त्यांना स्वतंत्र देश म्हणून दर्शविण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सरकारने यावर आतापर्यंत कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. जी-20 शिखर परिषद 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी रियाधमध्ये आयोजित होणार आहे.

जी-20 परिषदेचे आयोजन हे सौदी अरेबियाचे प्रशासन आणि युवराज सलमान यांच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे. 24 ऑक्टोबर रोजी या परिषदेला संस्मरणीय करण्यासाठी प्रशासनाने 20 रियालची चलनी नोट सादर केली आहे. याच्या समोरील बाजूला सौदी राजे सलमान बिन अब्दुल अजीज यांचे चित्र आहे. दुसऱया बाजूला जागतिक नकाशा आहे. यात जी-20 देशांना दर्शविण्यात आले आहे. यात काश्मीरसह गिलगिट व बाल्टिस्तानला पाकिस्तानचा हिस्सा म्हणून दर्शविण्यात आलेले नाही.

इस्रायलची वाढती भूमिका

सप्टेंबरमध्ये इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादचे प्रमुख योसी कोहेन यांनी अमेरिकेच्या निवडणुकीनंतर सौदी अरेबिया व अन्य अरब देशांसोबत इस्रायलचे कूटनीतिक संबंध सुरळीत होतील असे संकेत दिले होते. मात्र, पाकिस्तान इस्रायलसोबत राजनयिक संबंध प्रस्थापित करणार नसल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Related Stories

युवतीला दररोज 30 वेळा होते उलटी

Patil_p

कडाक्याच्या थंडीत चिनी सैन्य गारठले; लडाखमधून 10 हजार सैनिक मागे

datta jadhav

जर्मनीची ‘वॉन वेल्स’ भारतात उभारणार प्रकल्प

datta jadhav

फ्लॉयड हत्येप्रकरणी पोलीस अधिकारी दोषी

Patil_p

चीनमध्ये सर्वाधिक 9 कोटी चाचण्या

Patil_p

वाघ-सिंहांसोबत खेळणारा श्रीमंत शेख

Amit Kulkarni
error: Content is protected !!