तरुण भारत

टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएची छापेमारी

जम्मू काश्मीरसह बेंगळूरमध्येही कारवाई

वृत्तसंस्था / श्रीनगर

Advertisements

टेरर फंडिंगविरोधात राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने जम्मू काश्मीरमध्ये एकाचवेळी दहा ठिकाणी छापा टाकला आहे. जम्मू काश्मीरमधील स्वयंसेवी संस्थांद्वारे (एनजीओ) दहशतवाद्यांना पैसे पुरविले जात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. श्रीनगरमधील 9 तर बंदिपोरातील एका ठिकाणी छापा टाकला आहे. तसेच बेंगळूरमधील आरटीनगरमधील एचएमटी कॉलनीत स्वाती शेषाद्री नामक महिलेच्या निवासावरही छापा टाकला. सदर महिला जम्मू-काश्मीर कोऍलिशन ऑफ सिव्हिल सोसायटी श्रीनगरस्थित संस्थेच्या संपर्कात होती.

टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएने आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

स्वयंसेवी संस्थांद्वारे दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या संशयावरून एनआयएने केलेली ही मोठी कारवाई आहे. विदेशातून दहशतवाद्यांना एनजीओद्वारे टेरर फंडिंग करण्यात येत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्याआधारे ही कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी एनआयएने युएपीए कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी आणि फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देश परदेशातून निधी जमवून दहशतवाद्यांना पुरवठा करणाऱया एनजीओवर छापे टाकण्यात आले
आहेत.

व्यापार, धार्मिक कामे, सामाजिक कामे यासाठी पैसे जमवून त्याचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी करण्यात येत होता. हवालाद्वारे हे पैसे भारतात येत असल्याची माहितीही मिळाली आहे. याप्रकरणी एनआयएचे अधिकारी एनजीओच्या दस्तावेजांची तपासणी करत आहेत. छापे टाकण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ते टेरर फंडिंग करणाऱया एनजीओशी संबंधित असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे.

मुंबईतील 26/ 11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिझ सईदची एनजीओ फलह ए इन्सानियतने जम्मू काश्मीरमध्ये पाठवलेल्या पैशांच्या माध्यमातून काही जणांनी जमीन आणि मालमत्ता खरेदी केल्याची महिती मिळाली आहे. या मालमत्ता विविध शहरात खरेदी करण्यात आल्या आहेत. एनआयए याबाबतचे पुरावे जमा करत आहे.

Related Stories

केरळने वाढवले देशाचे टेन्शन

Patil_p

नाराजी, धार्मिक धुवीकरण – तृणमूलसमोरील आव्हाने

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शक्तीप्रदर्शन

Patil_p

राज्यात 24 तासात कोरोनाचे तीन बळी

Patil_p

पंतप्रधान मोदींचा युएई दौरा लांबणीवर

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

Rohan_P
error: Content is protected !!