तरुण भारत

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

ऑनलाईन टीम / गांधीनगर : 


गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे गुरुवारी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.  त्यांनी अहमदाबाद मधील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

Advertisements


गुरुवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशुभाई यांनी दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. 


बंडखोरीमुळे केशूभाईंना दोन्ही वेळा मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. 2001 मध्ये त्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांनी सीएम पदाची शपथ घेतली होती. तर सहा वेळा विधानसभेचे सदस्य झालेल्या केशुभाई यांनी 2012 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा राजकीय पक्ष गुजरात परिवर्तन पक्ष या नावाने सुरू केला. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत विसावदरमधून विजयी देखील झाले होते. मात्र त्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांनी 2014 मध्ये राजीनामा दिला.  

Related Stories

पश्चिम बंगाल : वादविवादानंतर दासगुप्तांकडून राज्यसभेचा राजीनामा

datta jadhav

“माझ्या पराभवासाठी दानवेंनी रुग्णालयात बसून पैसे वाटले”

Abhijeet Shinde

भारताच्या पहिल्या सीएनजी ट्रॅक्टरचे उद्या गडकरींच्या हस्ते उद्घाटन

Rohan_P

तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जींना पुन्हा समन्स

Patil_p

कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘Y’ श्रेणीतील सुरक्षा

datta jadhav

राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘जुलाई आ गया, वैक्सीन नहीं आयी’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!