तरुण भारत

नेसाय येथे रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला तीव्र विरोध

प्रतिनिधी / मडगाव

गोंयात कोळसो नाका या बिगर सरकारी संस्थेतर्फे सद्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध केला जात असून मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास नेसाय येथे रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम सुरू असताना त्याला तीव्र विरोध दर्शविण्यात आला. यावेळी मोठय़ा प्रमाणातत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रेल्वचे अधिकारी आणि विरोधात यांच्यात बराच शाब्दीक संघर्ष झाला.

रेल विकास निगम तर्फे सद्या वास्को ते कर्नाटक पर्यंतच्या रेल मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. केवळ कोळसा वाहतूक करण्यासाठी रेल मार्गाचे दुपदरीकरण केले जात असल्याचा आरोप गोंयात कोळसो नाका या संघटनेच्या वतीने केला जात असून या कामाला तीव्र विरोध सुरू झालेला आहे. तरी सुद्धा रेल विकास निगमने हे काम जारी ठेवल्याने मंगळवारी रात्री जोरदार संघर्ष झाला.

गोंयात कोळसो नाका या संघटणेचे कार्यकर्ते हातात मेणबत्ती तसेच रेल मार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध दर्शविणारे फलक घेऊन आले होते. संघटणेच्या वतीने अभिजीत प्रभुदेसाई यांनी रेल्वेच्या अधिकाऱयांवर प्रश्नाचा बडीमार केला. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी स्थानिक ‘पंचायतीचा ना हरकत दाखला’ मिळविला असल्यास तो सादर करण्यास सांगितले असता, रेल्वे अधिकाऱयांनी ना हरकत दाखल्याची जरूरी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सद्या जे काम सुरू आहे. ते रेल्वेची मालमत्ता असलेल्या जागेतच सुरू असल्याचा दावा केला.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

विरोधकांनी यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री लोक हिताच्या आड जाऊन योजना राबवित असल्याने, त्यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली. सरकारला स्थानिक लोकांच्या भावना जाणून घेण्याची इच्छा नाही. हे सरकार जनेतच्या विरोधात वागत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

रात्रीच्यावेळी रेल मार्गाचे काम करण्यासाठी रेल्वे विकास निगमने मोठय़ा प्रमाणात कामगार तसेच यंत्र सामुग्री नेसाय येथे आणली होती. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यास मान्यता दिल्याची माहिती यावेळी रेल्वे अधिकाऱयांनी दिली.

Related Stories

उसळणाऱया गर्दीमुळे कोरोनाच्या प्रसाराची भीती

Patil_p

पार्क केलेल्या रेल्वेत चोरीचा प्रयत्नः आरोपी अटकेत

Omkar B

पंचायतींची पाटी अद्याप कोरीच

Patil_p

बस्तोडा पंचायत क्षेत्रात तार नदीजवळ भाजी विक्रेत्यांची भाजी पंचायतीकडून जप्त

Omkar B

विश्वजित, सुदिन भेटल्याच्या संदेशामुळे राज्यात खळबळ

Omkar B

गृहनिर्माण मंडळाच्या निवासी गाळेधारकांना कायदेशीर हक्क मिळणार- मंत्री माविन गुदिन्हो

Amit Kulkarni
error: Content is protected !!