वाळपई : प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला प्राणपणानं विरोध करणार्या शेळ मेळावलीवासीयांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी भेट घेतली. लोकांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. एका मंदिरात स्थानिकांसोबत बैठक घेउन मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली. सरकार जनभावनेचा आदर करतं. परंतु अख्ख्या गावासमोर चर्चा होउ शकत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी १५ लोकांची समिती नेमावी आणि सरकारला चर्चेसाठी निमंत्रित करावं. लोकांच्या मतानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही स्थितीत लोकांच्या मताचा अनादर केला जाणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.


previous post