तरुण भारत

वारणा धरण व चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहिम

प्रतिनिधी / सांगली

वारणा धरण व चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. या अनुषंगाने पुनर्वसन विशेष मोहिम सुरू केली असून या मोहिमेंतर्गत वसाहत भेटीचा कार्यक्रम 8 डिसेंबर 2020 अखेर आयोजित केला आहे. त्यानंतर दिनांक 9 ते 24 डिसेंबर 2020 या कालावधीत प्राप्त अर्जाची छाननी, आवश्यक अहवाल, कागदपत्रे मागविणे व आवश्यकतेनुसार सुनावणी घेण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

तालुका निहाय वसाहतीचे नाव व कंसात कॅम्पचा दिनांक पुढीलप्रमाणे , येलूर व कुरळप (12 नोव्हेंबर), बोरगाव व चिकुर्डे (18 नोव्हेंबर), नेर्ले व साखराळे ( 19 नोव्हेंबर ). शिराळा – बिळाशी ( 3 नोव्हेंबर ), पतवारून ( 5 नोव्हेंबर ), मांगले ( 10 नोव्हेंबर), आरळा व सागांव (11 नोव्हेंबर). आष्टा अपर तहसिल – शिगाव व बामणी (20 नोव्हेंबर), आष्टा-1, आष्टा-2 (24 नोव्हेंबर), फाळकेवाडी, बहादूरवाडी (25 नोव्हेंबर), वाळवा व नवेखेड (26 नोव्हेंबर), आष्टा-3, आष्टा-4 व आष्टा-5 (8 डिसेंबर). सांगली अपर तहसिल – कसबे डिग्रज (2 डिसेंबर), दुधगांव-1 व दुधगांव-2 (3 डिसेंबर), तुंग (2 डिसेंबर), समडोळी (4 डिसेंबर).

Advertisements

Related Stories

‘ग्रामसंघ स्थापन केल्याने महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील’

Abhijeet Shinde

सांगली : राष्ट्रवादीने आपली वैचारिक लढाई कोणाबरोबर आहे हे समजून घ्यावे

Abhijeet Shinde

सांगली : बाल निरीक्षण गृहातून चार अल्पवयीन मुलांचे पलायन

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 14.03 टी.एम.सी. पाणीसाठा

Abhijeet Shinde

सांगली : उमदी ते कोंत्योव बोबलाद रस्त्यासाठी ६२ कोटी मंजूर : संजयकुमार तेली

Abhijeet Shinde

सांगली जिल्हा बँक घोटाळ्याची थेट पंतप्रधानांकडे तक्रार!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!