तरुण भारत

रखवालदाराच्या खुनाचे गुढ कायम

पोलीस तपास सुरू, कारण गुलदस्त्यात

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

सोनट्टी (ता. बेळगाव) येथील एका फॉर्म हाऊसवर झोपलेल्या वॉचमनचा खून करण्यात आला होता. खुनाच्या घटनेला दोन दिवस उलटले तरी अद्याप धागेदोरे सापडले नाहीत. खुनाचे कारणही गुलदस्त्यात आहे.

लक्ष्मण नानाप्पा हुलगण्णावर (वय 45, रा. हन्नीकेरी, ता. बैलहोंगल) असे त्याचे नाव आहे. तो सोनट्टी जवळील सुनील पाटील यांच्या फॉर्म हाऊसवर काम करीत होता. रखवालदारी करतानाच शेतीचे कामही करत होता. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गळा आवळून त्याचा खून करण्यात आला आहे.

काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. लक्ष्मणचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. बैलहोंगल व सौंदत्ती तालुक्मयात तपास करण्यात येत असून लक्ष्मण केवळ 9 महिन्यांपूर्वी कामानिमित्त सोनट्टीत आला होता. यापूर्वी तो कोठे होता? याचीही माहिती घेण्यात येत आहे.

Related Stories

खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथे एकाला कोरोनाची लागण

Rohan_P

केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

Rohan_P

काकती-गौंडवाडला जोडणाऱया संपर्क रस्ता कामाला प्रारंभ

Amit Kulkarni

भांडणानंतर किणये येथे घर पेटविले

Patil_p

हजारोंच्या संख्येने महामोर्चात सहभागी होणार युवा समितीच्या बैठकीत निर्धार

Amit Kulkarni

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱया तरुणाला पोलीस कोठडी

Patil_p
error: Content is protected !!