तरुण भारत

व्यवसाय परवाण्यासाठी अर्ज करण्याचे कॅन्टोन्मेंटचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

कॅन्टोन्मेंट हद्दीत व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. व्यवसायिकांनी 2020-21 वर्षाकरीता व्यवसाय परवाना घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत अर्ज करावे असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डने केले आहे. व्यवसाय परवाना नसताना व्यवसाय सुरू केल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कायद्यानुसार 5 हजार रूपये दंड वसुल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Advertisements

कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात असंख्य व्यवसायिक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच व्यवसाय परवान्याची यादी व शुल्क आकारणीची निश्चिती 19 वर्षापूर्वी करण्यात आली आहे. त्यानंतर असंख्य नवीन व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. पण या व्यवसायांचा समावेश व्यवसाय परवानाच्या यादीत करण्यात आला नाही. त्यामुळे व्यवसाय परवाना शुल्क आणि यादीचे नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. व्यवसाय परवाना शुल्क निश्चित करण्यासाठी सदस्यांची समिती स्थापन करून प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंटच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यवसाय परवाना यादी बनविण्यासाठी व शुल्क निश्चित करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने हालचाली चालविल्या आहेत.

व्यवसाय परवान्याची यादी बनविण्यासाठी माहिती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना कोणता व्यवसाय परवाना हवा हे जाणून घेण्यासाठी व्यवसाय परवान्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोंर्डच्या हद्दीत व्यवसाय परवान्याकरीता 2 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात कार्यालयीन वेळेत अर्ज करण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डने केले आहे. अर्ज करताना 150 रूपये अर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. व्यवसायानुसार परवाना शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. पण व्यवसाय परवाना मंजूर झाल्यानंतरच व्यवसाय परवाना शुल्क भरावा लागणार आहे. जर व्यवसायिकांनी विनापरवाना व्यवसाय सुरू केल्यास कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार 5 हजार रूपये दंड आकारण्यात येईल असा ईशारा देखील प्रसिद्धीपत्रकाद्वारे कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा यांनी दिला आहे.

Related Stories

महिला क्रिकेट स्पर्धेत जैन पँथर्स विजेते

Amit Kulkarni

जिल्हा प्रशासनातर्फे सेवालाल जयंती साधेपणाने

Amit Kulkarni

पुन्हा धावू लागले बेळगाव…

Patil_p

जिल्हय़ात आतापर्यंत 5.39 टक्के खरीप पेरणी

Amit Kulkarni

गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या

Patil_p

म. ए. युवा समिती आज शिक्षणाधिकाऱयांना निवेदन देणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!