तरुण भारत

पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्याने विविध भागात पाणी नाही

प्रतिनिधी/ बेळगाव

हिडकल जलाशयाच्या पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शुक्रवार दि. 30 आणि 31 रोजी शहराच्या उत्तर भागातील उपनगराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Advertisements

हिडकल जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. बसवणकोळ जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करून विशेषत: उत्तर विभागात पाणी वितरीत करण्यात येते. पण पंपहाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणीपुरवठा करणे अशक्मय आहे. कणबर्गी, ऑटोनगर, रामतिर्थनगर, महांतेश नगर, श्रीनगर, शिवबसवनगर, रूक्मिणी नगर, सुवर्णसौध आदीसह विविध वसाहतींचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

अल्पवयीन मुलांच्या कुटुंबीयांना न्यायालयाकडून दिलासा

Amit Kulkarni

चिकालगुड्ड येथे ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन

Amit Kulkarni

मानवी भावनांचा ठाव घेणारे नाटककार.. वसंत कानेटकर

Amit Kulkarni

राजवाळ ग्रामस्थांना खासगी व्यक्तीकडून होणारा त्रास त्वरित थांबवा

Amit Kulkarni

आरपीडी रोडशेजारील उघडे चेंबर पादचाऱयांसाठी धोकादायक

Amit Kulkarni

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

Amit Kulkarni
error: Content is protected !!