तरुण भारत

न्यूझीलंडच्या बार्कले यांना भारताचा पाठिंबा?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱया निवडणुकीमध्ये न्यूझीलंडचे उमेदवार क्रेग बार्कले यांना भारतीय क्रिकेट मंडळ आपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत न्यूझीलंडचे बार्कले आणि सिंगापूरचे इम्रान ख्वाजा हे उमेदवार रिंगणात आहेत.

Advertisements

भारताचे शशांक मनोहर यांनी यापूर्वी दोनवेळा आयसीसीचे अध्यक्षपद भूषविले होते. गेल्या जुलैमध्ये त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिकामे झाले आहे. नव्या अध्यक्षपदासाठी न्यूझीलंडचे बार्कले आणि सिंगापूरचे उस्मान ख्वाजा यांच्यात चुरशीची निवडणूक होत आहे. आयसीसीच्या कार्यकारी मंडळामध्ये 16 सदस्यांचा समावेश असून येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार आहे. अध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न चालू आहेत. मात्र भारतीय क्रिकेट मंडळाचा उस्मान ख्वाजा यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले. आगामी अध्यक्षपदासाठी ख्वाजांच्या तुलनेत न्यूझीलंडचे बार्कले हे योग्य उमेदवार असल्याचे बीसीसीआयला वाटत आहे. भारतीय क्रिकेटला ख्वाजा यांच्या धोरणांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता अल्प असल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱयांने दिली आहे. भारताबरोबर द्विपक्षीय क्रिकेटचे संबंध अधिक मजबूत करण्याकरिता बार्कले प्रयत्नशील असल्याने त्यांना भारतीय क्रिकेट मंडळाचा या आगामी निवडणुकीत पाठिंबा मिळेल, असे एका ज्येष्ठ क्रिकेट प्रशासकांनी म्हटले आहे.

आयसीसीसमोर सध्या काही समस्या आहेत पण आयसीसीचे विद्यमान उपाध्यक्ष   ख्वाजा हे बीसीसीआयच्या धोरणाशी अनुकूल नसल्याचे जाणवते. यापूर्वी भारताचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासमवेत ख्वाजा यांनी काम केले असले तरी यावेळी बीसीसीआयकडून त्यांना पाठिंबा मिळेल, याची खात्री देता येत नाही. आयसीसीच्या कार्यकारिणी मंडळामध्ये बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात तीव्र मतभेद असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

पूर्णिमा पांडेला सुवर्णपदक

Patil_p

पीव्ही सिंधू दुसऱया फेरीत

Patil_p

स्वीसचा वावरिंका विजेता

Patil_p

ऑलिंपिक नेमबाज विजय कुमार घेतोय कायद्याचे शिक्षण

Patil_p

होमबर्ग टेनिस स्पर्धेतून हॅलेपची माघार

Patil_p

ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात डळमळीत सुरूवात

Patil_p
error: Content is protected !!