तरुण भारत

कोरोना संकटात सॅमसंगला विक्रमी नफा

तिमाहीत कंपनीचा नफा 59 अंकांनी वधारत 1089 अब्ज डॉलर्सवर

वृत्तसंस्था/ सोल 

Advertisements

जगासोबत देशातील विविध कंपन्यांवर कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे काही कंपन्या काही प्रमाणात अनलॉकनंतर सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु यामध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन निर्मितीमध्ये कार्यरत असणारी दिग्गज कंपनी सॅमसंगने तिमाही नफा कमाईचा  एक नवा विक्रमच नोंदवला असल्याची माहिती गुरुवारी कंपनीने दिली आहे.

सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकूण नफा हा जवळपास 59 टक्क्यांनी वधारुन 1089 अब्ज डॉलर्सवर गेला असून नफा कमाईने दोन वर्षाचा उच्चांक प्राप्त केला आहे.

याच दरम्यान कंपनीचे उत्पन्न आठ टक्क्यांनी वाढून उच्च्चांकी 59 अब्ज डॉलर्सच्यावर राहिले आहे. आतापर्यंतच्या तिमाहीमधील हा सर्वाधिक उत्पन्न कमाईचा आकडा असल्याची नोंद केली आहे.

विक्रमी विक्री

कंपनीला इतका मोठा लाभ मिळवून देण्यामध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर मेमरी चिप, स्मार्टफोन आणि अन्य उपकरणांची विक्री सहाय्यभूत ठरली असल्याचे सांगण्यात येते.

चीन-अमेरिका तणावाचा लाभ

कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये अमेरिका आणि चीन यांच्यातील सुरु असणाऱया तणावाच्या वातावरणाचा लाभ दोन्हीकडून घेण्यात सॅमसंग यशस्वी झाली आहे. अमेरिका आणि भारत यांच्याकडून चीनच्या काही कंपन्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे जगभरात सॅमसंगकडे स्मार्टफोनसह दूरसंचार उपकरणांना मोठी मागणी राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

Related Stories

देशातील निर्यात 36.47 टक्क्मयांनी घसरली

Patil_p

चेन्नईत हय़ुंडाईचे उत्पादन सुरु

Patil_p

432 अंकांच्या मजबुतीने सेन्सेक्स सावरला

Patil_p

सन फार्माला 984 कोटींचा नफा

Amit Kulkarni

बायजूकडून आणखी एक अधिग्रहण

Amit Kulkarni

…अखेर ‘झोमॅटो’ शेअर बाजारात लिस्ट

Amit Kulkarni
error: Content is protected !!