तरुण भारत

भारतात एलजीचा रोटेटिंग स्क्रीनचा स्मार्टफोन सादर

नवी दिल्ली

 दक्षिण कोरियन कंपनी ‘एलजी’ने मागील काही दिवसांपासून ग्राहकांच्या प्रतिक्षेत असणारा रोटेटिंग स्क्रीनचा विंग स्मार्टफोन भारतात सादर झाला आहे.  सदर फोनमध्ये एक स्क्रीन 90 डिग्रीपर्यंत फिरणारी आहे. सदरचा फोन हा रेग्युलर (वन स्क्रीन) फोनच्या पद्धतीने वापरता येणार आहे. दोन स्क्रीन असल्यामुळे फोनचा आकार हा तुलनेने मोठा आहे.

Advertisements

एलजी विंग स्मार्टफोनची भारतामधील किंमत 69,990 रुपये राहणार आहे. ज्यामध्ये 128 जीबी स्टोरेज मॉडेलचा समावेश राहणार आहे. हा फोन ऑरोरा ग्रे आणि इल्युजन स्काय आदी रंगात उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. स्मार्टफोनची विक्री ही 9 नोंव्हेबरपासून सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

सॅमसंगचा ए 42 जी स्मार्टफोन लाँच

Patil_p

दमदार कॅमेऱयाचा गॅलेक्सी ए 32 लाँच

Patil_p

आले रोबो व्यवस्थापन

tarunbharat

रियलमी नार्जोला दमदार प्रतिसाद

Omkar B

रियलमीचा ‘4 के टीव्ही-एक्स 7’ स्मार्टफोन होणार सादर

Patil_p

‘एअरपॉड मॅक्स’चे ऍपलकडून लाँचिंग

Omkar B
error: Content is protected !!